आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नैराश्यावर निसर्गच रामबाण उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निसर्गसान्निध्याचा परिणाम केवळ तात्पुरता नसतो. ही एक निसर्गोपचार पद्धतीदेखील आहे. याचा प्रभाव दीर्घकाळ टिकून राहतो. नैराश्यावर हा अचूक उपचार आहे.
मी आणि माझा एक मित्र परिषदेनिमित्त टोकियोला गेलो होतो. या प्रवासादरम्यान आम्हाला जंगलात भटकंतीची संधी मिळाली. तासन् तास बगिचांत भटकंती, विविध रंगांना न्याहाळणे, पानांचे स्पर्श, बागेतील सुगंधित वातावरण यामुळे मन व मेंदू शांत झाले. जपानमध्ये सकुरा सीझन होता. या वेळी गुलाबी चेरींचा बहर असतो. जपानी लोक मोठ्या प्रेमाने बागा जोपासतात.

निसर्गाचा तणावमुक्तीसाठी उपयोग, या विषयावर नुकतेच एक व्यापक संशोधन झाले आहे. निसर्ग आपल्याला केवळ तणावमुक्तच ठेवतो, असे नाही तर तो आनंदाचा स्रोतही आहे, असे यात सिद्ध झाले. हिरवा रंग उपचाराचे कार्य करतो. निसर्गसान्निध्यात मन व मंेदू दोन्हींची कार्य क्षमता वाढते. प्रत्येक ३ पैकी २ तणावग्रस्त व्यक्ती तणावमुक्तीसाठी एकांत वा निसर्गसान्निध्याची मदत घेतात, असे संशोधनात दिसून आले.

फॉरेस्ट बादिंग : जपान्यांनी शिनरिन योकू किंवा फॉरेस्ट बादिंगची संकल्पना विकसित केली आहे. यानुसार ते जंगलात भटकंती करतात. या उपचारामुळे नैराश्य, अस्वस्थता बऱ्याच अंशी कमी होते. डेन्मार्क येथे एक बगिचा आहे. याला अल्नार्प असे नाव आहे. येथे सायकॉलॉजिकल रिस्टोरेशन उपचार पद्धती दिली जाते. या बगिचात त्यांना अनेक दिवस ठेवले जाते. निसर्गसान्निध्यामुळे मेंदू शांत होतो. महिलांना या उपचार पद्धतीमुळे एकाग्रता वाढल्याचे दिसून आले. तणावमुक्ती व नैराश्यावर हमखास ही मात्रा लागू पडते.

खुल्या वातावरणात उपचार
निसर्गसान्निध्यात स्वत:ला करा तणावमुक्त.
शहरात राहत असाल तर जवळच्या एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी वा जंगलात फिरायला जा. किमान ३० मिनिटे हिरवळीच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करा. आठवड्यातून ३-४ वेळा तरी हा प्रयोग करा. कोणी मित्र किंवा कुटुंब सदस्य तणावग्रस्त, निराश असेल तर त्याला निसर्गसान्निध्यात वेळ घालवण्याचा सल्ला द्या.

वर्कआऊट शक्यतो मोकळ्या वातावरणात करण्याचा प्रयत्न करा.
हिरवा व निळा रंग उपचारासाठी योग्य आहेत. जवळ एखादा तलाव किंवा झरा असेल तर तिथे अवश्य भेट द्या. तुमच्या कार्यालयात खिडक्या नसतील, सतत वातानुकूलित ठिकाणी काम करावे लागत असल्यास स्वत:जवळ एखादे रोप, शिंपले किंवा फुलदाणी ठेवू शकता.
बातम्या आणखी आहेत...