(छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)
नवरात्रीच्या काळात गरबा(लोक नृत्य) खेळण्याची गुजरातमध्ये परंपरा आहे. तर इतर राज्यांमध्ये गरबा खेळणे म्हणजे फॅशन बनले आहे. या काळात ब-याच शहरांमध्ये विशेष प्रबंध करण्यात येतात. परंतु बराच वेळ गरबा खेळल्याने तुमची एनर्जी लेव्हलवर परिणाम होतो.त्यासाठी कही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. याने तुमची एनर्जी लेव्हल टिकून रहण्यास मदत होईल. अभ्यासु व्यक्तींच्या मते रात्री उशीरापर्यंत गरबा खेळला जातो त्यासाठी तुम्हाला आठ तासांची झोप आवश्यक आहे. गरब्याचा आनंद तुम्हाला योग्य पद्धतीने घेता यासाठी आम्ही तुम्हाला काही उपयोगी टिप्स देत आहोत. यामुळे तुमची एनर्जी लेव्हल उत्तम राहण्यास मदत होईल.
1-गरबा खेळताना प्रचंड घाम येतो त्यामुळे दिवसातुन कमीत कमी 12 ते 15 ग्लास पाणी आवश्य प्यावे.
2- तुम्ही जर रोज गरबा खेळण्यासाठी जाणार असाल तर तुमच्या रोजच्या आहारात 300-400 कॅलरींचे प्रमाण वाढवा.
3- सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि 1/4 टी-स्पून मध एकत्र करुन प्यावे.
4- सकाळी 10 ते 11 च्यामध्ये जास्त प्रमाणात कॅलरी असणा-या फळांचे सेवन करावे.
5- दुपारच्या जेवणात 2 पोळ्या, भाजी ,दही, सलाड आणि एखादा गोड पदार्थाचे सेवन करा.
तसेच दुपारी मिल्क शेक,ज्युस अथवा नारळाचे पाणी प्यावे.
आणखी टिप्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...