आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेत जाताना मुलांना दिलेला टिफिन जसाचा तसा परत येत असेल तर करा हा प्रयोग...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंगापूरमध्ये राहणाऱ्या ली मिंग दोन मुलांची आई आहेत. त्यांची इवान टे (१०) आणि लुकस टे (७) जेवणाच्या बाबतीत फार टंगळमंगळ करायचे. शाळेत त्यांचा टिफिन जसाचा तसा परत येत होता. ही समस्या सोडवण्यासाठी मिंग यांनी एक शक्कल लढवली. तीन वर्षांपूर्वी त्यांनी फूड अरेंजिंग कला चराबेंस शिकली. यात त्यांनी खाद्य पदार्थांना वेगवेगळ्या आकारात डिझाइन करून टिफिनमधून देणे सुरू केले.
दररोज एक नवे डिझाइनचा पदार्थ पाहून मुलेदेखील आनंदाने जेवू लागली. डिझायनर पदार्थांमुळे मुलांचे टिफिनकडे लक्ष आकर्षले जाऊ लागले. परिणामी भरून येणारा टिफिन आता रिकामा येऊ लागला. त्यांनी प्रथम तांदळापासून सुपर मारियो तयार केला होता. आतापर्यंत मुलांच्या टिफिनसाठी १०० पेक्षा जास्त क्रिएशन्स तयार केले. त्यांच्या या प्रयोगाने शिक्षक मित्रदेखील प्रभावित झाले. आतातर मुले आईकडे उद्या काय हवे, याची मागणी करतात.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा आणखी वेग-वेगळ्या आकारातील पदार्थ...