आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Everyone From Beginners To Conditioned Athletes Can Benefit By Adding Resistance Tubes Bands To Their Strength Training Program

स्वत:ला फिट ठेवण्यासाठी स्वस्त आणि सोपा पर्याय रेझिस्टन्स बॅंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इलॅस्टिक किंवा रबरापासून बनलेले छोटेसे उपकरण रेझिस्टन्स बॅंड तुम्हाला घरबसल्या कमी खर्चात फिट ठेवू शकते. हे व्यायाम आणि स्टेचिंग दोन्हींसाठी उपयुक्त आहे. या उपकरणाचे फायदे आणि शरीर फिट ठेवणार्‍या काही व्यायामांची माहिती देत आहोत.
स्वस्त : याची किंमत फक्त २०० रुपयांपासून सुरू होते. ऑनलाइन शॉपशिवाय हे फिटनेस प्रॉडक्ट विक्री करणाऱ्या दुकानातूनही खरेदी करता येऊ शकते.
सोपा: याच्याशी संबंधित व्यायाम सोपे असतात. व्यायामापूर्वी करण्यात येणाऱ्या स्ट्रेचिंगमध्येही याचा वापर करता येईल.
छोटे: रेझिस्टन्स बँड्स खूप छोटे असतात. डंबेल्स आणि मशीन्स इत्यादी फिटनेस उपकरणांपेक्षा याला खूप कमी जागा लागते.
परिणामकारक: हेबँड्स शरीराच्या जवळपास सर्व प्रमुख स्नायूंसाठी परिणामकारक आहेत. याच्या मदतीने शरीरास लवचिक बनवता येते.
सुरक्षित: रेझिस्टन्स बँड्स खूप हलके आणि मऊ असतात. यापासून इजा होण्याची शक्यता कमी असते आणि सुरक्षितरीत्या व्यायाम करता येतो.
विविधता: हलके, मध्यम आणि जड प्रकारांत उपलब्ध आहे. यामुळे तुम्ही व्यायामाला आपल्या सोयीनुसार कठिण अथवा सोपे बनवू शकतात.
सोयीस्कर: या उपकरणाचा तुम्ही घरी किंवा बाहेर कुठेही वापर करू शकता अगदी जिथे जिम इत्यादी काहीच नाही तिथेही.
फायदे: यामुळे कंबरदुखी, सांधेदुखीचा त्रास दूर होतो. तसेच कंबर आणि नितंबाच्या हाडांची घनताही वाढवता येते. कंबर कमी करण्यासाठीही सहायक आहे.