आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहज सुलभ योगासने : शलभासन (द्विपाद)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे पोटावर झोपून करावयाचे आसन आहे. भुजंगासनाच्या उलट हे आसन आहे. म्हणून भुजंगासन केले की शलभासन करावे.

कृती : १.जमिनीवर पोटावर झोपावे. पाय जुळवावेत. हात शरीराच्या दोन्ही बजूस ठेवावेत.
२. हनुवटी जमिनीला टेकलेली.
३. दीर्घ श्वास घेऊन रोखून धरावा. मनगटाने जमिनीवर दाब
देऊन दोन्ही पाय वर उचलावेत. थोडा वेळ या स्थितीत राहून पाय सावकास खाली आणावेत.
लाभ : फुफ्फसाची कार्यक्षमता वाढते. लहान व मोठी आतडी बलवान बनतात. अपचन गॅसेसच्या तक्रारी दूर होतात. मासिक पाळीच्या तक्रारी दूर होतात. सरकलेले गर्भाशय स्थानावर येते. पाठदुखी नाहीशी होते.

लेखिका योगशिक्षिका आहेत