आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: तुमचा बैठा जॉब आहे, हा सोपा योगा करा, पाठदुखी होणार नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या बऱ्याच जणांचा बैठा जॉब असतो. ऑफिसच्या बाहेर जाण्याची गरज नसते. दिवसभरातील बहुतांश तास केवळ खुर्चीवर बसून राहावे लागते. कामात व्यस्त असल्याने वेळ कसा निघून जातो समजत नाही. पण घरी गेल्यावर पाठ मात्र अकडल्या सारखी होते. दुखते. काही वेळा प्रचंड कळा येतात. काही जणांना हा त्रास कायमचा जडतो. त्यातून सुटका करुन घेणे अवघड होऊन बसते.
आम्ही आपल्यासाठी काही सोप्या योगा स्टेप्स घेऊन आलोय. पाच ते दहा मिनिटांत तुम्ही या योगा स्टेप पूर्ण करु शकता. घरी सकाळच्या सुमारास जरा निवांत वेळ असला की तुम्ही या स्टेप्स करुन पाठ मोकळी करु शकता. या योगाने तुम्हाला पाठदुखीचा त्रास जडणार नाही. उलट पाठ मोकळी झाल्याने दुसऱ्या दिवशीही ताजेतवाने वाटेल.
योगा प्रशिक्षक व्यत्स बसकौसकास यांनी या व्हिडिओ रुपात सादर केल्या आहेत.
सौजन्य- Udaya
बातम्या आणखी आहेत...