आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्रीच्या गाढ झोपेत दडले आहे, दीर्घायुष्य व स्वस्थ राहण्याचे रहस्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माइक जीलिंस्की जाणून होते की जेव्हा त्यांच्या उंदरांनी झोपणे बंद केले, तेव्हा कोणती तरी खास गोष्ट समोर येणार आहे. सामान्यत: जनावरे १२ तासांच्या चक्रानुसार झोपतात आणि जागी होतात. जेव्हा प्रयोगशाळेत लाइट जळत होती तेव्हा उंदीर सक्रिय होते. अंधार झााल्यानंतर ते झोपले. जानवर हार्वर्ड मेडिकल कॉलेजमध्ये  मनोविज्ञान शिकविणारे जीलिंस्की यांनी उंदरांना जागे ठेवण्यासाठी त्यांच्या दिनचर्येतच बदल केला.  
 
जीलिंस्की आणि त्यांच्या साथीदारांनी पिंजऱ्यातील उंदरांना जागे ठेवले. काही दिवसांनतर त्यांच्यात डोळे मिटणे, चालण्यात सुस्ती येणे ही कमी झोपेची लक्षणे दिसू लागली. त्यांची विद्युत उपकरणांच्या सहाय्याने तपासणी केली असता, त्यांच्या मेंदूच्या हालचाली मंद झाल्याचे दिसून आले.  पण  जीलिंस्की यांनी लक्षपूर्वक पाहिले की, त्यांची झोपमोड केल्यानंतर त्यांना झोपण्यासाठी एकटेच सोडण्यात आल्यानंतरही ते झोपू शकले नाहीत.  जीलिंस्की यांना शंका होती की, जनुकातील बदलामुळे उंदरांमध्ये झोपेची समस्या निर्माण झाली आहे.  त्यांच्या मंेदूची तपासणी केली असता, असे लक्षात आले की त्यांची झोप गाढ नव्हती. संशोधक असा विचार करतात की, योग्य परिस्थितीमध्ये हृदय, फुप्फुसे, पचनक्रिया, नर्व्हस सिस्टिम, मांसपेशी यांना मेंदू असा संदेश पोहोचवितो की, आता झोपण्याची वेळ आली आहे.  जीलिंस्की यांच्या संशोधनात दिसून आले की, या उंदरांप्रमाणेच झोपेची कायम समस्या असणाऱ्या लोकांमध्येही, त्यांच्या मेंदूकडून योग्य संदेश मिळत नाहीत.  जीलिंस्की यांचे हे संशोधन यासाठी महत्त्वाचे आहे की, गाढ झोपेचा चांगले स्वास्थ्य आणि दीर्घायुष्याशी बराच संबंध आहे. 
 
संशोधकांनी हे जाणून घेतले आहे की, झोप कमी होत असल्याने शरीराची प्रत्येक प्रणाली प्रभावित होते.  काही पाहण्यांमध्ये असे आढळून आले की, ज्या लोकांची झोप कमी किंवा अनियमित राहिली आहे त्यांना हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा असे विकार होण्याची शक्यता आहे, ज्याच्यामुळे लवकर मृत्यू होऊ शकतो. कमी झोपेचा मेंदूवर परिणाम होतो. यामुळे नैराश्य, मतिभ्रम, बेचैनी आणि अल्झायमरचा धोका वाढू शकतो.  धूम्रपान, खराब अाहार आणि योग्य व्यायाम न केल्याचे आणि कमी झोपेचे परिणाम एकच आहेत तो म्हणजे लवकर मृत्यू. कॅलिफोर्निया बर्कले विद्यापीठात मनोविज्ञान आणि न्यूरो सायन्सचे प्रोफेसर मॅथ्यू वाॅकर  म्हणतात की, आहार आणि व्यायामाबरोबरच पुरेशी झोप ही चांगल्या आरोग्याचा तिसरा स्तंभ आहे. 
 
टेक्सास युनिव्हर्सिटीमध्ये न्यूरो सायन्सचे प्रोफेसर  डेविड स्कन्येर यांचे म्हणणे आहे की, झोपेतील वेळेच्या बदलामुळे शरीराची पूर्ण सिस्टिमच बदलते.  यासाठी आजार आणि अपमृत्यूचा संबंध अनिद्रेशी आहे.  एका ताज्या पाहणीत आढळून आले आहे की, उपाशी राहण्यापेक्षा अनिद्रेमुळे उंदरांचा मृत्यू लवकर झाला.  तरीही काही लोक दीर्घ आयुष्यासाठी रात्रीच्या झोपेस महत्त्वपूर्ण मानत नाहीत.  
 
तसे पहायला गेले तर झोपेचे काही जैविक फायदे आहेत. २०१४ मध्ये रोचेस्टर युनिव्हर्सिटी मधील न्यूरो तज्ज्ञ डॉ. मायकेन नेडरगार्ड यांनी पहिल्यांदा सांगितले की, झोपेच्या वेळी शरीर आराम करत असते. पण मेंदूच्या आत बऱ्याच काही हालचाली चाललेल्या असतात.  इलेक्ट्रिक सिग्नल्सने युक्त न्यूरॉन तरंग एका लयीत मेंदूची धुलाई करीत असतात. मेंदू सुनिश्चित करतेा की,  हार्मोन, एंझाइम आणि प्रोटीन यांचे संतुलन राहील.  या दरम्यान मंेदूच्या पेशी अाकुंचन पावून आपली एक जागा निर्धारित करतात. ज्यामुळे सर्वप्रकारच्या समस्या निर्माण करणारी विषारी तत्त्वे, न्यूरॉन द्रव बाहेर फेकून देईल. रात्रीत मेंदूच्या धुलाईशिवाय धोकादायक टॉक्सिन स्वस्थ पेशींना नुकसान पोहोचवू शकतात आणि एक दुसऱ्याशी संपर्क बनविण्याच्या त्यांच्या क्षमतेत बाधा आणतात. यामुळे स्मृती कमजोर होते.  विचार आणि भावना यावरील नियंत्रणावर परिणाम होतो. झाेप कमी झाल्याने मेंदूच्या पेशी वेगाने वृद्ध होतात. 

उंदरांवर नेडरगार्डच्या संशोधनाने झोपेचे फायदे आणि त्यांच्या जैविक कार्यप्रणालीवर नवीन विचारांचा मार्ग दाखवला आहे.  शास्त्रज्ञ बऱ्याच काळापासून हे जाणून आहेत की, स्मरणशक्तीसाठी चांगली झोप असणे महत्त्वाचे आहे. पण आता हे लक्षात येत आहे की, झोपेच्या वेळी मेंदू वेगाने दिवसभराच्या घटनांचा आढावा घेत असताे. या आठवणींशी जोडलेल्या भावनाही ताे आठवून पाहात असतो.  जेव्हा झोपेच्या वेळी कोणतीही आठवण येते, तेव्हा दिवसभरातील भय, दु:ख, राग, आनंद या भावनांना वेगळे करते.  
 
निद्राविषयक तज्ज्ञ वॉकर म्हणतात की, काही आठवण्यासाठी आणि विसरण्यासाठी आपण झोपचा आधार घेत असतो. मी याला रात्रीकालीन थेरपी म्हणतो. या प्रकारच्या प्रक्रियेला वेळ लागतो. सततच्या रात्रींमुळे गाढ झोपेमुळे असे होण्याची शक्यता असते. यामुळे समजते की, जे लोक कमी झोपतात किंवा ज्या लोकांच्या झोपेत बाधा येते, ते आपुऱ्या आठवणीतून भावनांचे ओझे पूर्ण पद्धतीने काढू शकत नाहीत.  वाॅकर म्हणतात  “तुम्ही जितक्या जास्त रात्री झोपताल तितका आठवणींवर जास्त शांतीपूर्ण प्रभाव पडतो. झोप ही त्या भावनात्मक स्मृतींवर प्रभाव टाकते आणि एक आठवड्यानंतर ते बाहेर काढून टाकते. काही डॉक्टरांचा विश्वास आहे की, मानसिक आजाराने पीडित लोकांना चांगल्या झोपेने फायदा मिळतो. यासाठी भोजन आणि व्यायामाप्रमाणेच झोपही महत्त्वाची असते.

सात तासांची झोप गरजेची
२००२ मध्ये अमेरिकन कॅन्सर सोसायटीने दहा लाख लोकांचा अभ्यास केल्यानंतर असे सुचविले की, दीर्घायुष्यासाठी सात तास झोप आवश्यक आहे.  हा अभ्यास सहा वर्षे चालू होता. तथापि ज्या लोकांचे वय जास्त आहे त्यांना  कमी झोप चालू शकते तर तरुणांना जास्त झोप लागते. फिनलँडमध्ये २१००० जुळ्या लोकांच्या २२ वर्षानंतरच्या अभ्यासाने लक्षात आले की, नियमितपणे सात तासापेक्षा कमी झोप घेणारे लोकांमध्ये मृत्यूचे प्रमाण २१ ते २६ टक्क्यांनी वाढू शकते. 

किशोरांसाठी साडे ८ तास 
तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की,किशोरवयीन मुलांना स्वस्थ राहण्यासाठी साडेआठ तासांची झोप गरजेची आहे.  काही देशांमध्ये लोकांची झोप कमी होत आहे. अमेरिकेन लोक एक शतकांच्या तुलनेत, आता प्रत्येक रात्री दोन तास कमीच झोपतात.  कामाचे वाढते तास, टेक्नोलॉजी, सोशल मीडिया, सततच्या बातम्या, यामुळे परिणाम झाला आहे.  एक तृतीयांश अमेरिकन प्रौढ सात तासापेक्षा कमी झोपतात.  केवळ १५ ते ३० टक्के अमेरिकन किशोरवयीन मुले साडेआठ तास झोप घेतात. 

तणावामुळे लवकर वृद्धत्व
वैज्ञानिक हे जाणून अाहेत की, तणावामुळे म्हातारपण लवकर येते.  ज्या व्यक्तीला पुरेशी झोप येत नाही, तो नेहमीच तणावात राहतो.  ज्यामुळे वास्तवात काही नुकसान होत नाही, अशा काल्पनिक धोक्याबाबत तो फार प्रतिक्रिया दाखवितो.  जसे मध्यरात्री जाेरात आवाज, वेळेतच काम करण्यासाठी दबाव, उन्मत्त जनावर पाहून रक्तदाब वाढतो, श्वास घ्यायला अडचण येते, हृदय धडधडू लागते, ज्यांची झोप पुरेशी झालेली नसते,त्यांचे हेच हाल होतात.  
 
कमी झोपेमुळे काय नुकसान होते?
} झोप अस्ताव्यस्त झाल्याने शरीराची सर्व प्रणाली कमजोर होते.  
} हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणाचा धोका. 
} नैराश्य, मतिभ्रमसहित अनेक मानसिक आजारांची भीती. 
 
आणखी काही गंभीर समस्या
शरीरात सतत जळजळ, सूज (इनफ्लेमेशन)मुळे काही प्रकारचे कर्करोग संवेदना हरविणे, हृदयविकार, टाइप २ मधुमेह आणि कायमचे दुखणे अशा समस्या होऊ शकतात. जळजळ, जखम किंवा जीवाणू, विषाणू यांच्या विरोधात शरीराची नैसर्गिक बचाव प्रणाली आहे. हे कायम राहिले तर शरीरात गडबड होते. पुरेशी झोप नसल्यास जळजळ हे लक्षण दिसतात.   
बातम्या आणखी आहेत...