आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 मिनिटांमध्ये Job Interview पास करण्यासाठी आवश्यक 13 Tips

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )

स्पर्धेच्या जगामध्ये केवळ शिक्षण घेतल्याच्या डिग्रिमुळे नोकरी मिळत नाही. कॉम्पिटिशनच्या या जमान्यात तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे दिसणे, काहीतरी वेगळे करून दाखवणे आणि मुलाखत देताना समोरच्या व्यक्तीला तुमच्या वेगळेपणाने प्रभावित करणे आवश्यक आहे. तुम्ही कितीही मेहनत करून तुमचे शिक्षण पूर्ण केले असले तरे, मुलाखतीच्या वेळेस तुमचा स्मार्टनेस तुम्हाला उपयोगी ठरत असतो. त्यासाठी तुम्हाला मुलाखतीसाठी नेमक्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे महत्त्वाचे आहे. या छोट्या-छोट्या गोष्टींमुळे तुम्हाला तुमच्या मनातील नोकरी मिळण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला जॉब टिप्सबद्दल सांगणार आहोत. या टिप्समुळे तुम्हाला लवकरात लवकर नोकरी मिळण्यास मदत होईल.
TIP-1 कंपनीबद्दल संपूर्ण माहिती घ्या -
ज्या कंपनीमध्ये तुम्ही मुलाखतीला जाणार आहात त्या कंपनीबद्दलची पूर्ण माहिती जाणून घ्या. कंपनीच्या ग्रोथबद्दल तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असल्यास तुम्ही त्यांच्या वेबसाइटवर जावू शकता. यामुळे तुम्हाला कंपनीबद्दल अचूक माहिती मिळण्यास मदत होईल. मुलाखतीला जाण्यापूर्वी कंपनीची यूएसपीदेखील माहिती करून घ्या. असे केल्याने कंपनीच्या कामाबद्दल विचारलेल्या अनेक प्रश्नांवर उत्तर देऊ शकाल.
इतर टिप्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...