आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाह सोहळ्यात लांब जॅकेटला पसंती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लांब नववधू जॅकेट, गाऊन आणि साडी सदोदित फॅशनमध्ये असतातच. यांचे सौंदर्य प्रत्येक पिढीला मोहित करते. प्रयोगशील नववधूंना विवाह सोहळ्यासाठी पारंपरिक मात्र जरा हटके वस्त्रे वापरावी वाटतात.

कशिदा केलेले लांब जॅकेट, फुलांचे विणकाम, प्रिंट, बारीक कलाकुसरीचे जॅकेट्स गाऊन व लहंग्यावर संुदर दिसतात, असे डिझायनर पायल जैन सांगते. नाजूक लेस आणि बारीक कशिद्याचे जॅकेट विवाहासाठी चांगला पर्याय ठरतो.

सध्या नववधू आपल्या पोशाखांविषयी जास्त चोखंदळ झाल्या असल्याचे डिझायनर जे. जे. वालिया म्हणतात. आजी, आईचा पारंपरिक वारसा चालवतानाच त्यात त्यांना मॉड फीलर्स हवे असतात. त्यामुळे चांगली संगती मिळते.

भारतीय साडी सौंदर्याचा मापदंड असल्याचे पायल सांगतात. देशात व परदेशात राहणार्‍या भारतीय महिलांच्या मनावर साडीचे गारूड दिसून येतेच. फॉर्मल लग्न समारंभ, कॉकटेल्स, ब्लॅक टाय इव्हेंट्ससाठी शिफॉन व सॅटीनची नाजूक साडी, तर जॉर्जेट, जकार्ड‌्स, लेस वर्कच्या साड्याही पसंत केल्या जातात. प्रसंगानुरूप साडीची निवड केली जाते. सध्या नववधू गुलाबी व लालऐवजी बेज वा ऑफ व्हाइटला अधिक पसंती देतात. त्यांना प्रयोगशील राहणे आवडते.

डिझायनर गौरव गुप्ता त्यांच्या साडी गाऊन डिझाइन्ससाठी प्रसिद्ध आहेत. सध्या नववधू जुन्या ठोकळेबाज कल्पनांना टाळत असल्याचे गौरव सांगतात. त्यांना लहंग्यावर चोळीऐवजी जॅकेट जास्त पसंत आहेत. साडी लहंगा यालाही पसंती मिळते. पारंपरिक व आधुनिकतेचा मेळ घालण्याचा प्रयत्न करत असल्याचे गौरव सांगतात.

ड्रेसमध्ये भव्यता आणण्यासाठी नववधू दोन दुपट्ट्यांची निवड करतात. त्या साडीसोबत बाजूबंद, चंदेरी-सोनेरी बेल्टलाही पसंती देतात. दुहेरी दुपट्ट्यात एक पदराच्या बाजूने वापरला जातो, तर दुसरा कंबरेला बांधला जातो. कोलकात्याच्या स्टाइल गुरू अनामिका खन्ना दक्षिण भारतीय साड्यांवर अनेक प्रयोग करतात. बेल्ट कंबरेला बांधून त्याला एक स्ट्रक्चर्ड लूक मिळतो.

आता महिला केवळ विविधरंगी स्टोन्सने आकर्षिक होत नाहीत. साधा लूक आता मंत्र बनला आहे. जरदोजी वा धाग्यांच्या कशिद्यापेक्षा उंच कॉलर, व्हिक्टोरियन स्टाइल, स्कॅलप नवी मज्जा देते. अनामिका जॅकेटचे सौंदर्य वाढवण्यासाठी वेगळ्या पोताचे पातळ कॉर्ड‌्स वापरतात, तर पायल भरजरी जॅकेट अनिवार्य असल्याचे मानतात. ते खूप स्टायलिश असतात. बीड कशिद्यामुळे व्हिंटेज टोन मिळतो. जुन्यावरच आधुनिक संस्कार केले जात आहेत.
अस्मिता अग्रवाल
फॅशन लेखिका, नवी दिल्ली
बातम्या आणखी आहेत...