आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरातच झटपट बनवा उपवासाचे हे 10 रुचकर पदार्थ, जाणून घ्या कृती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उपवास म्हटले तर शाबुदाणा खाऊन कंटाला येतो. तर आपण उपवासाचे नविन पदार्थ खाऊया. थोडा कसरत केली की, उपवासाचे विविध पदार्थ बनवता येतात. अगदी झटपट आणि चविष्ट पदार्थ आपण बनवु शकतो. चला तर मग पाहुया अशेच काही रुचकर उपवासाचे पदार्थ...
केळीचा रायता
साहित्य
1. पिकलेली केळी: ३
2. वाळलेले बारीक खोबरे: १/२ कप
3. लिंबू: १
4. वेनिला किंवा साधे दही: १ कप
5. बारीक कापलेले बदाम: १ टेबल स्पून
कृती
- वाळलेले बारीक खोबरे कोरडे च तांबुस होईपर्यंत भाजा.
- केळ्यांचे तुमच्या आवडीनुसार काप करा. त्या कापांना लिंबाचा रस चांगला लावा म्हणजे केळी काळी पडणार नाहीत.
- त्या कापांमधे दही, खोबरे आणि बदाम टाकून चांगले एकत्र करा. झाला तुमचा रायता तयार.
- तुम्ही हा रायता गार करून किंवा तसाच खाऊ शकता. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्यात थोडी साखर घालू शकता.
- हा रायता तुम्ही साइड डिश म्हणून किंवा स्नॅक म्हणून तसेच खाऊ शकता.
पुढीस स्लाईडवर वाचा... रुचकर पदार्थांच्या रेसिपी....