आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लठ्ठपणामुळे अनेक आजार, शहरांत ७०% लोक त्रस्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लठ्ठपणा हा आजही एक मोठी समस्या आहे. लठ्ठपणा हा अनेक आजारांचे मुख्य कारण आहे. अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेच्या एका सर्व्हेक्षणातनुसार जगात १.२ अब्ज लोक लठ्ठपणाने पीडित आहेत. अन्य एका अभ्यासानुसार भारतातील शहरी भागांतील ७० टक्के लोक लठ्ठपणा किंवा अधिक वजनाच्या समस्येने ग्रस्त आहेत. आयसीएआरच्या माहितीनुसार जगभरात दरवर्षी ६० ते ८० दशलक्ष विवाहित दांपत्यांना मूल होत नाही. भारतात ही संख्या १५ ते २० दशलक्ष आहे.
तेलकट, फॅटयुक्त पदार्थांची आवड असलेल्या लोकांना लठ्ठपणाचा धोका कितीतरी पटींनी अधिक असतो. अशा प्रकारच्या आहारामुळे शुक्राणूंशी संबंधित समस्या निर्माण होतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शहरी भागातील चुकीच्या जीवनशैलीमुळे लोक लठ्ठपणाचे शिकार होत आहेत. सहजपणे मिळणारे फास्टफूट, जसे की बर्गर, चिप्स आदींमधील कॅलरी लठ्ठपणा वाढविण्यास मोठ्या प्रमाणात मदत करतात. त्यातच कमी शारिरीक श्रमामुळेही मोठे नुकसान होत आहे.

}नपुंसकता: लठ्ठपणामुळे मोठ्या संख्येने नपुंसकता वाढत आहे.

लठ्ठपणा टाळण्याचे उपाय
लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपल्या आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. आहार संतुलित हवे. प्रोटिन, व्हिटामिन, कार्बोहायड्रेटचे प्रमाण आहारात भरपूर असले पाहिजे. जंक,फास्टफूड टाळाले पाहिजे. हिरव्या पालेभाज्यांचा अधिक समावेश हवा. जास्तीस जास्त पाणी प्यावे. यासोबत शारिरीक श्रम अत्यावश्यक आहेत.
डॉ.अनुभा सिंह
गायनाकोलॉजिस्ट,
आयव्हीएफ तज्ञ, दिल्ली
बातम्या आणखी आहेत...