आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Five Tricks To Avoid Swine Flu Decease, Know Symptoms And Impacts

असा टाळा \'स्वाईन फ्लू\'चा जिवघेणा व्हायरस, वाचा लक्षणे, 5 महत्त्वाचे उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या काही दिवसांमध्ये स्वाईन फ्लूचा धोका वाढला आहे. या व्हायरसने पुन्हा डोके वर काढले आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांची संख्या कमी असली तरी मेट्रो शहरांपासून दूर असलेल्या अगदी लातूरसारख्या ठिकाणी या व्हायरसने काही जणांना मृत्यूच्या जाळ्यात ओढले आहे. शिवाय याची लागण होणाऱ्या रुग्णांमध्ये दिवसागणित वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संसर्ग झाल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा तो टाळण्यावर भर दिला जात आहे. याचा संसर्ग होऊ नये यासाठी जाणून घ्या 5 महत्त्वाचे उपाय...
स्वाईन फ्लूला पिग इन्फ्लुआंझा, हॉग फ्लू, पिग फ्लू किंवा H1N1 व्हायरस असेही म्हटले जाते. यापूर्वी 2009 मध्ये याचा मेट्रो शहरांत मोठ्या प्रमाणावर उद्रेक झाला होता. यावेळी त्याला जिवघेणा साथीचा आजार असे घोषित करण्यात आले होते. याचा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होतो.
स्वाईन फ्लूची लक्षणे-
ताप, थंडी वाजणे, कफ, घशात खवखव होणे, अंगदुखी आणि डोकेदुखी
सध्या स्वाईन फ्लुची लस बाजारपेठेत उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त हा व्हायरस टाळण्याचे पाच उपाय वाचा पुढील स्लाईडवर...