आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोडव्याच्‍या योग्य संतुलनासाठी चला बनवुयात अनोख्या तेवढ्याच चविष्ट डिशेस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्या स्वीट डिशला खास बनवण्यासाठी त्यात योग्य प्रमाणात गोडवा असणे आवश्यक आहे. गोडव्याचे हेच योग्य संतुलन एखाद्या डिशला खास बनवते.

एखाद्या डिशची चव कशी असली पाहिजे, याबाबत आमच्यासारख्या शेफच्या मनात नेहमीच प्रश्न उपस्थित होत असतात. एखादी स्वीट डिश किती गोड असावी? एखादा चटपटीत पदार्थ किती आंबट असला पाहिजे? असे प्रश्न प्रत्येक शेफला त्रस्त करत असावेत. मी यासाठी एक पद्धत अवलंबतो. मी प्रत्येक डिश संतुलित पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करतो. स्वीट डिशमध्ये तेवढेच गोड वापरतो जेवढे कमीत कमी आवश्यक असते. तसेच एखादी चटपटीत रेसिपी बनवताना आंबट खूप कमी वापरतो. मला असे वाटते की, कुकिंगमध्ये बेसिक इंग्रीडियंट्सची चवही असली पाहिजे. तुम्ही नॉनव्हेज बनवत असाल तर मटण किंवा चिकनची चव मसाल्यांमुळे कमी होता कामा नये. अशाच प्रकारे तुम्ही केक किंवा पेस्ट्री बनवणार असाल तर बेस केकची चव आयसिंगमुळे लपता कामा नये. या वेळी मी तुमच्यासाठी संतुलित पद्धतीने बनवण्यात आलेल्या दोन रेसिपी घेऊन आलो आहे.
पीच क्रंबल
साहित्य: चारचमचे कंडेन्स्ड मिल्क, एक कप पीच, एक चमचा बटर, एक चमचा मध, एक चमचा पीठ, एक चमचा साखर.
कृती:
अर्धीसाखर कॅरामलाइज्ड करून वेगळी ठेवा. पीचचे तुकडे केल्यानंतर ते या तयार कॅरामलमध्ये चांगल्यारीतीने मिसळा. एका बेकिंग डिशमध्ये कंडेन्स्ड मिल्क टाका. आता यावर पीचचा थर लावा. एका बाउलमध्ये उरलेली साखर टाकून त्यात बटर आणि मध मिसळा. यामध्ये पीठ टाकून मिक्स करा. हे मिक्स पीचवर टाकून 175 डिग्रीवर प्रीहिटेड ओव्हनमध्ये 20 मिनिटांसाठी शिजवून घ्या. गरम-गरम सर्व्ह करा.
पुढील स्‍लाईडवर जाणून घ्‍या लेमन चीज केक तयार करण्‍याची रेसिपी...