आलू 65
हैद्राबादी पदार्थ केवळ गोश्त आणि चिकन बिर्याणीपर्यंतच मर्यादित नाहीये. तर हैद्राबादमधील शाकाहारी व्यंजनदेखील तेवढेच लोकप्रिय आहे. आज आम्ही तुम्हाला हैद्राबादी रेसिपीबद्दल सांगणार आहोत.
बनवण्यासाठी सामाग्री
5 बटाटे
3 मोठे कांदे
1/5 कप दही
1/2 चमचा अजीनोमोटो
3 हिरवी मिर्ची
मीठ स्वादानुसार
3/4 चमचे लाल मिर्ची पावडर
तळण्यासाठी तेल
2 चमचे बेसन
1/4चमचे बेकिंग पावडर
1/4चमचा गरम मसाला
1 चमचा लिंबाचा रस
तयार करण्याची रेसिपी
कुकरमध्ये बटाटे एक शिंट्टी घेऊन उकडून घ्यावे. बटाटे पूर्णपणे उकडायचे नाही. एक शिंट्टी झाल्यानंतर बटाटे बाहेर काढून त्याचे सालं काढावे. आता बटाटे चौकोनी आकारात कापून घ्या. कापून झाल्यानंतर त्यावर मीठ ,बेकिंग पावडर व बेसन टाकावे. कढईमध्ये तेल गरम करून घ्यावे आणि त्यामध्ये बटाटे कुरकुरे होईपर्यंत तळून घ्यावे. तळून झाल्यानंतर पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यावे. त्यामध्ये कांदा आणि हिरवी मिर्ची भाजून घ्यावी. यानंतर तयार केलेल्या मिश्रणात मीठ,लाल मिर्ची पावडर व गरम मसाला टाकून चांगले एकत्र करून घ्यावे. साधारण मध्यम आचेवर तेल वेगळे होईपर्यंत शिजवून घ्यावे. 4 ते 5 मिनिटे शिजवून गरमा-गरम सॉससोबत खायला द्यावे.
पुढील स्लाइडवर वाचा, घरी कसे बनवावे बुरानी रायता...