आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीरयष्टीतील दोष घालवण्यासाठी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ताडासन : भिंतीच्या आधारे सरळ उभे राहा. दोन्ही हात सरळ ठेवा. तुमच्या टाचेचा मागचा भाग, पिंढऱ्या, कमरेखालचा भाग, डोके, पाठीचा वरचा भाग भिंतीला टेकलेला असावा. यामुळे मांड्यांचे स्नायू सक्रिय राहतात. याचा पद्धतीने ५ मिनिटे उभे राहा.

उत्तानासन : भिंतीपासून थोडे पुढे या. डोके समोरच्या बाजूला झुकवा. डोक्याला गुडघ्यांच्या मधोमध आणा. आता हाताने जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. वाकल्यानंतर पुन्हा भिंतीच्या जवळ या. तुमच्या कमरेखालचा भाग व पिंढऱ्यांना भिंतीचा आधार द्या. या स्थितीत ५ ते १० वेळा श्वास घ्या. एखाद्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखील हा योगप्रकार करा.

त्रिकोणासन : भिंतीच्या विरुद्ध बाजूने पायात अंतर घ्या. किमान २ फुटांचे अंतर असावे. उजवा पाय समोरच्या बाजूने स्ट्रेच करा. दोन्ही हात खांद्याच्या स्तरावर पसरवा. हात जमिनीच्या समांतर असावेत. हळूहळू उजव्या बाजूला झुकत जा. डावा गुडघा सरळ असावा. पाठीचा व कमरेखालच्या भागाला भिंतीचा आधार द्या. उजव्या हाताकडे चेहरा करून श्वास घ्या. यामुळे पिंढऱ्या, खांदे, पाठीचा कणा यांना स्ट्रेच मिळतो.
बातम्या आणखी आहेत...