आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवड्यातील 5 दिवस करा हे योगा पॅकेज, गळणार नाहीत केस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केस गळण्याची समस्या अगदी सामान्य झाली आहे. पुरुष असो वा स्त्री ही समस्या सर्वांना भेडसावते. काही जणांनी तर केसात हात टाकल्यावर, हातात लगेच केस येतात. कपड्याने डोके पुसत असताना त्याला चिटकून केस येतात. विशेष म्हणजे आंघोळ करताना केस गळाले असतानाही कंगवा करताना त्यात केस अडकून येतात. जर तुम्हालाही ही समस्या भेडसावत असेल तर योगसाधना करा. त्याने शरीरातील अंतर्गत समस्या दूर होतील.
21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाणार आहे. यानिमित्त आम्ही आपल्यासाठी योग पॅकेज सिरिज घेऊन आलोय. या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू, की काही योगासने करुन तुम्ही तुमच्या समस्या कशा प्रकारे दूर करु शकता. तुम्ही केस गळण्याच्या समस्येने बेजार झाले आहात तर योगसाधना करा. तुमचे केस गळणे थांबेल. शरीरही सुदृढ राखले जाईल. मनात चैतन्य नांदेल. तुमचा दिवसभरातील उत्साह वाढेल.
धनुरासन
पोटाची चरबी कमी होते. आंतरिक अवयव, मांसपेशी आणि सांध्यांचा व्यायाम होतो. मानेच्या समस्या दूर होतात. केस मजबूत आणि चमकदार होतात.
विधी
पोटाच्या भारावर जमिनीवर झोपा. पाय गुडघ्यांपासून मागे वळवा. दोन्ही हातांनी पायांचे पंजे पकडा. त्यानंतर शीर, खांदा, छातीला जमिनीपासून वर उचला. जरा वेळाने हातात पकडलेले पायाचे पंजे सोडा. यावेळी श्वास सामान्य राखा. हळूहळू शीर, खांदा आणि छातीला जमिनीवर आणा. हळूच श्वास सोडा.
पुढील स्लाईडवर वाचा, आणखी काही योगासने, यांनी केस गळण्याची समस्या होईल दूर...