आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Harpal Singh Sokhi Article About Recipes Of Bihar Foods

स्वादिष्ट आहेत हे बिहारी पदार्थ, नक्कीच आवडतील तुम्‍हाला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिहारच्या बहुतांश घरांमध्ये दैनंदिन जेवणामध्ये भाकरी, भाजी(शाकाहारी), वरण-भात, दही, बटाटा चोखा, लिट्टी चोखा, लोणचे, तूप, पापड, चटणी आणि कोशिंबीर असा आहार घेतला जातो. मी बालपणी या सर्व पदार्थांचा आनंद लुटल्याने स्वत:ला लकी समजतो.
आमच्या शेजारी एक बिहारी महिला राहत होत्या. त्यांचा मुलगा माझा चांगला मित्र आणि स्कूलमेट होता. शाळा संपल्यावर मी दररोज त्यांच्या घरी जात असे आणि या पदार्थांचा आनंद घेत असे. मित्राची आई दररोज वेगवेगळे पदार्थ बनवत असत. यामध्ये खिचडी, बटाटा चोखा, लिट्टी चोखा, ठेकुआ, लोणचे, पापड, कोशिंबीर आदींचा समावेश होता. हे माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय पदार्थ आहेत. आज आपण जाणून घेऊया बटाटा चोखा आणि ठेकुआ हे बिहारी पदार्थ कसे बनवतात...
ठेकुआ
साहित्य: अर्धाकिलो गव्हाचे पीठ, चमचे किसलेले नारळ, तीनशे ग्रॅम गूळ, ४-५ इलायची (पावडर) चमचे तूप, दीड कप पाणी आणि तेल.

कृती:सर्वप्रथमगूळ,पाणी आणि इलायची चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्या. यामध्ये चमचे तूप, पीठ आणि नारळाचा किस मिळवा. आता याचे चापट गोल बनवून घ्या. यासाठी गुळाचे योग्य प्रमाण असू द्या. आता हे लालसर होईपर्यंत कढईमध्ये तळून घ्या. यानंतर यावरील अतिरिक्त तेल काढून चवीने खा.
पुढील स्‍लाईडवर जाणून घ्‍या बटाटा चोखाची पाक कृती...