आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेचव आहारामुळे स्थूलता वाढण्याची शक्यता अधिक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्थूलता टाळण्यासाठी विशिष्ट पदार्थांना कायमचे दूर सारणे योग्य नाही. आवश्यक , संयमित आणि मनाला समाधान देणारा आहार घ्या. शिवाय तणावापासूनही दूर राहण्याचा प्रयत्न करा.
प्रत्येक पदार्थ संयमाने खा
तुम्हीअत्याधिक प्रमाणात गोड, जंक फूड किंवा मसालेदार आहार घेतला तर वजन वाढते. प्रत्येक खाद्य पदार्थाकडे चांगले-वाइट असे पाहू नका. प्रत्येक पदार्थ खा. मात्र संयमाने.

सुखदायी आहार घ्या
आनंदालाभुकेपेक्षा जास्त महत्त्व द्या. जो आहार आपण नापसंत करतो तो खाल्ल्यास काहीच लाभ नाही. माणसाच्या जिभेवर जवळपास १०००० चवींच्या पेशी असतात. पैकी बहुतांश पेशी चोवीस तास सक्रिय असतात. अन्नद्वेष करून उपाशी राहू नका. त्यामुळे अस्वस्थता येते. जंक फूडकडे कल वाढतो.
तणावाला ठेवा दूर
तुम्ही अतिरिक्त कामाच्या आेझ्याने , व्यक्तिगत समस्येमुळे किंवा वाढत्या पोटाच्या घेरामुळे चिंताग्रस्त असाल तर आधी चिंतावृत्ती दूर ठेवा. उष्मांक घटवण्याइतकीच त्याचीही आवश्यकता आहे. जे लोक स्थूलतेवर विजय मिळवतात ते चिंतांना दूर सारतात हे वास्तव आहे.