Home »Health And Lifestyle» Healthy Food Habits Of Kim Kardashian Which Keeps Her Fit And Young

कोळशाचे ड्रिंक पिते किम कर्दाशियन! जाणुन घ्या का आहे खास

दिव्य मराठी वेब टीम | Mar 20, 2017, 10:16 AM IST

हे जाणुन आश्चर्य वाटेल की, किम कर्दाशियन कोळसा(चारकोल) आणि लिंबूने तयार केलेले एक खास ड्रिंक पिते. कर्दाशियनचा दावा आहे की, चारकोल लेमोनेड ड्रिंकमुळे ती डिलिवरीनंतर आपले वजन कंट्रोल करण्यात यशस्वी ठरली आहे. काय आहे हे चारकोल लेमोनेड ड्रिंक?
नावावरुनच कळते की, यामध्ये चारकोल आणि लिंबू असते. परंतु हे चारकोल भट्ट्यांमधील नसते. हे अॅक्टिवेटेड चारलोक असते, जे स्पेशल प्रोसेस व्दारे तयार केले जाते. अॅक्टिवेडेट चारकोलचा वापर प्राचिन काळात काही खास औषधींमध्ये केला जात होता. विशेषतः बॉडीमध्ये विष गेले तर हे दूर करण्यासाठी चारकोलने तयार केलेले औषध दिले जात होते. आज हे बॉडीचे टॉक्सिन्स दूर करण्यासाठी यूज केले जात आहे.

कर्दाशियनमुळे ट्रेंडमध्ये आले हे ड्रिंक :
वेस्टर्न कंट्रीजमध्ये चारकोल लेमोनेड ड्रिंक सध्या खुप ट्रेण्डमध्ये आहे. याचे श्रेय कर्दाशियनला दिले जाते. टॉक्सिन्स दूर करण्यासाठी आणि वजन कंट्रोल करण्यासाठी अनेक सेलेब्स हे ड्रिंक पितात.

कसे बनवतात चारकोल लेमोनेड?
एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा अॅक्टिवेटेड चारकोल पावडर मिसळतात. हे उकळल्यावर गाळून घेतात. यामध्ये वरुन लिंबूचा रस टाकून हे लेमोनेडमध्ये रुपांतरीत केले जाते. खरेतर वेस्टर्न कंट्रीजमध्ये हे पॅकेज्ड ड्रिंकच्या रुपात जास्त मिळते. भारतात याचे चलन नाही.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अजून कायकाय खाणे आणि पिणे पसंत करते किम...

Next Article

Recommended