आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्यदायी आहार : असे बनवा घरच्या घरी चिजी मशरूम आणि बनाना अॅपल पॉरिज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक व्यक्तींना रोज वेगवेगले चटकदार पदार्थ खाण्याचा छ्ंद असतो. परंतु, आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाकडे वेळेचा अभाव असल्याने आहाराकडे दूर्लक्ष होत आहे. त्यामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अनेक व्यक्ती झटपट फास्ट फूड खाण्याकडे वळत आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच दोन पदार्थांच्या रेसिपीबद्दल सांगणार आहोत ज्या बनवण्यास अतिशय सोप्या आणि आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर अशा आहेत.
चिजी मशरूम

साहित्य :
मोठ्या आकाराचे वीस मशरूम, चार चमचे बटर, फिलिंगसाठी सात टेबल चमचे किसलेले चीज, एक चमचा बारीक कापलेला कांदा, एक चमचा बारीक कापलेली हिरवी मिरची, एक चमचा मैदा, तीन चतुर्थांश कप दूध, एक चमचाभर मोहरीची पावडर.
कृती :

एका पॅनमध्ये दोन चमचे बटर गरम करा. त्यात कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत कलसू द्या. त्यात हिरवी मिरची आणि मैदा टाकून मिक्स करा. त्यात दूध टाकून हलवा आणि घट्ट होईपर्यंत शिजवा. नंतर मोहरीची पावडर टाका आणि चीज मिसळून शिजवा. मशरूमला आकार येऊ द्या. त्यात तयार चीज फिलिंगला भरा. इतर पॅनमध्ये उरलेला दोन चमचे बटर गरम करा. त्यात मशरूमला चांगल्या प्रकारे शेकून घ्या सर्व्ह करताना थोडेसे चीज टाकायचे विसरू नये.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, बनाना अॅपल पॉरिज कसे बनवावे याच्या रेसिपीबद्दल...