आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Healthy Sleep Benefits On Child Mind Read More At Divyamarathi.com

पालकत्व.. चांगली गाढ झोप घेणारी मुले गणितामध्ये पुढे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चांगल्या झोपेमुळे आरोग्य उत्तम राहते. हे आपणास माहीत होते, परंतु चांगल्या गाढ झोपेमुळे मुलांचा मेंदू गणितापेक्षाही तेज असतो, असे संशोधन कॅनडातील मैकजिल युनिव्हर्सिटी आणि डग्लस मेंटल हेल्थ युनिव्हर्सिटीत केले गेले. ७५ मुलांच्या झोपेचा अभ्यास करण्यात आला. याच्यात सात आणि ११ वयादरम्यानच्या मुलांवर पाच रात्री अभ्यास करण्यात आला.
सर्व मुलांच्या हातात घड्याळासारखे डिव्हाइस घालण्यात आले. त्या माध्यमातून त्यांच्या झोपण्याची पद्धत नोंदवण्यात आली. या अभ्यासात पुढे आले की, ज्या मुलांनी गाढ झोप घेतली. त्या मुलांचा गणितात अभ्यास चांगला राहिला. यामुळे त्यांच्या विज्ञान आणि कला विषयांवर काहीही परिणाम झाला नाही. रूट ग्लॅबर क्लिनिकल चाइल्ड सायकॉलॉजिस्टच्या मतानुसार कमी झोप आणि गाढ झोप घेतल्यामुळे अभ्यासावर परिणाम होतो.
सल्लागारांनी सांगितले की त्यामुळे मुलांच्या पूर्ण आणि गाढ झोपेकडे लक्ष द्यायला हवे. मुलांना त्यांची कामे वेळेवर करायला लावा. त्यांच्या वेळापत्रकात आठ तासांच्या झोपेचा समावेश अवश्य करावा.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, सकारात्मक विचारांचा हृदयावर काय परिणाम होतो...