आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RECIPE: उन्हाळ्यात हे हेल्दी सरबत घेऊन राहा कूल...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्हाळा आणि विविध सरबते यांचे समीकरण ठरलेलेच आहे. थंडगार सरबतांनी मनाला गारवा मिळतोच शिवाय, शरीरालाही थंडावा मिळतो. वेगवेगळ्या प्रकारची सरबते पिऊन राहा थंड, कूल...
रताळ्याचे बटरमिल्क शेक
साहित्य :
- 2-3 लाल मध्यम आकाराची रताळी,
- 2 ग्लास गोड ताक
- 1/2 वाटी साखर
- 1 चमचा वेलची पूड
- 2-3 काड्या केशर, चिमटभर मीठ
कृती:
सर्वप्रथम थोडे मीठ घालून रताळी कुकरमध्ये छान उकडून घ्यावी. उकडलेली रताळी गार करून, सोलून, कुस्करून घ्यावी. मिक्सरमध्ये कुस्करलेली रताळी, ताक, साखर, वेलची पूड, केशर, मीठ घालून मिल्कशेकसारखे घट्ट करावे. हवे असल्यास अजून तोडी साखर घालावी. फ्रिजमध्ये गार करून सर्व्ह करावे. उपवासासाठी हे वेगळे आणि उत्तम पेय आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या डाळिंबाचे आणि टरबूजाचे स्वादिष्ट सरबत बनवण्याची रेसिपी....