आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हृदयविकारामुळे होणारे ४५ टक्के मृत्यू उच्च रक्तदाबातून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, हृदयरोगामुळे जगभरात दरवर्षी १ कोटी ७० लाख लोकांचा मृत्यू होतो. मृत्यूच्या एकूण प्रमाणाच्या हे एकतृतीयांश इतके आहे. यातील ४५ टक्के मृत्यूचे कारण उच्च रक्तदाब आहे. हृदय किती प्रमाणात रक्ताभिसरण करत आहे आणि धमण्यांतील रक्तप्रवाहात किती अडचणी आहेत, हे रक्तदाबावरून ठरते. रक्तदाब पार्‍याच्या मिलिमीटर्समध्ये (mmHg) ते माेजले जाते. २० वर्षांपेक्षा मोठ्या व्यक्तीत हे प्रमाण १२०/८० असायला हवे. यात सिस्टोलिक रक्तदाब क्रमांक आधी (१२०) व त्यानंतर डायस्टोलिक रक्तदाब क्रमांक (८०) असतो.

सिस्टोलिक दाब : रक्ताभिसरणासाठी हृदयाचे ठोके पडतात तेव्हाचा रक्तदाब. डायस्टोलिक रक्तदाब : ठोक्यांदरम्यानचे रक्तदाब. धमणी रक्तप्रवाहावर कसे नियंत्रण ठेवते, हे यावरून कळते.

निदान व लक्षणे : १४०/९० किंवा वेगवेगळ्या वेळच्या नोंदींदरम्यान सामान्यपेक्षा अधिक रक्तदाब असणे म्हणजे उच्च रक्तदाब. बहुतांश लोकांत उच्च रक्तदाबाची लक्षणे आढळत नाहीत. काही लोकांना प्रारंभिक स्थितीत उच्च रक्तदाबामुळे डोकेदुखी व चक्कर येते. हृदयरोगाच्या (कोरोनरी आर्टरी डिसीज अर्थात सीएडी) शक्यतेच्या अनेक धोक्यांपैकी एक म्हणजे उच्च रक्तदाब होय. धमण्यांत मेद जमा झाल्याने सीएडीची शक्यता असते. यात हृदयाकडे रक्तपुरवठा करणारी धमणी टणक व अडथळायुक्त होते. मधुमेहामुळे उच्च रक्तदाब व हृदयरोगाच्या आजाराचा धोका वाढीस लागतो. कारण मधुमेहामुळे धमण्यांवर बराच परिणाम होतो व ते त्यास निमुळते बनवते. यामुळे उच्च रक्तदाब होऊ शकतो. त्यावर उपाय न केल्यास रक्तवाहिन्यांना नुकसान पोहाेचू शकते आणि हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो.

रक्तप्रवाहाची अडचण असलेल्या धमण्यासाठी अँजिओप्लास्टी हे प्रभावी उपचार आहेत. नवीन जनरेशनच्या ड्रग इल्युटिंग स्टेंटसारख्या रिसोल्युट इंटिग्रिटी उपलब्ध आहेत. या निमुळत्या धमण्यांतही कार्य करू शकतात. ड्रग इल्युटिंग स्टेंट हे मधुमेहाच्या रुग्णासाठी यूएस एफडीएने प्रमाणित केलेला पहिला आणि एकमेव उपाय आहे.
डॉ. प्रवीण अग्रवाल
संचालक, फोर्टिस- अ‍ॅस्कॉर्ट््स हार्ट इन्स्टिट्यूट, नवी दिल्ली
बातम्या आणखी आहेत...