आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्तीनंतर आपणाकडे इतका पैसा असावा, असा लावा हिशेब...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घर, गाडी, मुलांचे शिक्षण, इत्यादी प्रत्येक गरजेसाठी बाजारात कर्ज मिळते. फक्त कागदपत्रे देण्याचा उशीर आहे, परंतु तुम्हाला हेही माहिती असेल की, कर्ज व्याजासह फेडावे लागते. यात कोणतीही सवलत मिळत नाही. निवृत्तीआधी काही ना काही जुळवणी करण्यासाठी कर्ज फेडूनच तुम्ही मुक्त होऊ शकता. येथे एक कॅल्क्युलेशन दिले आहे. पाहा, तुमच्या फायद्याचे ठरते का?
भरपूर पगार आणि सहजपणे उपलब्ध होणारे कर्ज यामुळे भारतीयांच्या जीवनशैलीत बदल दिसून येत आहे. ज्यांचे वय ३१ ते ४० वर्षांच्या दरम्यान आहे आणि त्यांची कमाई चांगली असेल तर ते ऐशोआरामाचे जीवन जगतात. राहण्यासाठी स्वत:चे घर, समाजात चांगले स्थान असते. तथापि, या जीवनशैलीत मिळालेल्या काही गोष्टी गहाण ठेवलेल्या असतात. त्यांच्यावर दरमहा हप्ता फेडण्याची चिंता असते. याबरोबरच काही काळानंतर मुलांच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी येते. तेव्हा मात्र निवृत्तीदरम्यान पैसा शिल्लक राहत नाही. त्याचबरोबर महागाई वाढते अाहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढत असतात. यामुळे आपली क्रयशक्ती घटत जाते. आज जी वस्तू १० रुपयांना मिळते ती पुढच्या महिन्यात ७ टक्क्यांनी वाढते. याचा अर्थ असा की, आपला खर्च दरवर्षी वाढत जातो. तुम्हाला आयुष्यात दरवर्षी जास्तीचा खर्च करावा लागणार आहे. याच वर्षी झालेल्या एका पाहणी अहवालात म्हटले आहे की, २५ ते ३० वर्षांत महागाईचा सरासरी दर ७ टक्के राहिला होता. जर आता तुम्ही १० हजार रुपये खर्च करत असाल तर २५ वर्षांनंतर तुमचे ५४ हजार ७२४ रुपये दरमहा खर्च होणार आहेत. जर निवृत्तीनंतर २० ते २५ वर्षे जगाल आणि तुमच्या जीवनाचे नियोजन व्यवस्थित केले नसेल तर तुम्हाला पुढच्या काळात त्रास सहन करावा लागणार आहे.

किती रक्कम लागेल?
निवृत्तीनंतर किती पैसे हातात पडतील यावरून एका व्यक्तीला चिंता सतावत होती. निवृत्तीनंतर पेन्शन मिळणार नसेल तर आयुष्य कंठावे कसे? एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवणे गरजेची आहे की, आताची जीवनशैलीच निवृत्त काळात अाधार ठरेल. महागाई जसजशी वाढत जाईल तसे तुमच्याकडील जमा असलेल्या पैशाचे मूल्य घटत जाणार आहे.

तुमच्या भविष्यातील गरजांवर विचार करणे गरजेचे आहे. कारण नंतरच्या आयुष्यासाठी चांगली योजना आखता येईल. निवृत्तीनंतर तुमचे खर्च पहिल्यासारखे राहणार नाहीत. ते कमी होतील. कारण तुम्ही कर्जमुक्त असाल. मुलांचे शिक्षण पूर्ण झालेले असेल. म्हातारपणात तुम्हाला औषधांचाही खर्च लागेल. जर तुमच्यावर कोणतीही जबाबदारी नसेल तर सध्याच्या तुलनेत तेव्हा ५० ते ६० टक्के इतका खर्च लागतो. म्हणजे आजच्यापेक्षा अर्धा.

निवृत्तीनंतर किती पैशांची गरज भासेल याचा अंदाज लावण्यासाठी वयाचा अंदाज घ्यावा लागेल. तुम्ही ७५ वर्षे जगण्याचा अंदाज बांधत असाल तर त्यात ५ ते १० वर्षे आणखी वाढवा. खाली निवृत्तीनंतरचा अंदाज दिला आहे. ३५ वर्षे वयाची एक व्यक्ती वयाच्या ६० व्या वर्षी निवृत्त होणार आहे. जर ती ८५ वर्षे जगणार असेल तर काय होईल?
तेव्हा किती असेल मासिक उत्पन्न
मासिक उत्पन्न २०००० ३००००० ५०००००
मासिक खर्च १५००० २५००० ४००००
निवृत्तीनंतर खर्च ९००० २५००० २४०००
महागाई ७% ७% ७%
निवृत्त हाेण्यास २५ २५ २५
इतकी वर्षे
निवृत्तीनंतरचा ४८८४७ ८१,४११ १,३०,२५८
दरमहा खर्च
आयुष्यमान ८५ ८५ ८५
निवृत्तीनंतरची २५ २५ २५
चांगली वर्षे
निवृत्तीदरम्यान
किती पैसा असावा
१.१८
कोटी
१.९७
कोटी
३.२५
कोटी
निवृत्तीदरम्यान महागाई दर ६ टक्के गृहीत धरला जातो. जी जमा रक्कम आहे त्यावर परतावा ८ टक्के.
तथापि, निवृत्तीच्या अाधी महागाईचा दर ७ टक्के इतका असेल.

वर दिलेले आकडे महागाईचा परिणाम दर्शवतात आणि कमी वयातच निवृत्तीचे प्लॅनिंग केले पाहिजे. खाली दिलेल्या आकडेवारीनुसार तुम्ही बचतीस उशीर कराल तर तशी तुम्हाला जास्तीत जास्त बचत करावी लागणार अाहे. यासाठी काही वर्षांनी तुमच्यावर दबाव वाढेल. चांगल्या भवितव्यासाठी वयाच्या ३० ते ३५ व्या वर्षापासूनच प्लॅनिंग केली पाहिजे.

निवृत्तीनंतर इतके पैसे लागतील
निवृत्तीनंतर लागणारा पैसा
१.१८ कोटी १.१८ कोटी १.१८ कोटी
कधीपासून गुंतवणूक कराल (वय) ३० ३५ ४०
निवृत्त होण्याचा काळ ३० ३५ २०
परतावा (टक्केवारीनुसार) १२ १२ १२
मासिक बचत इतकी कराल ३,९०० ७,००० १३,०००
निवृत्तीसाठी गुंतवणूक
गुंतवणुकीसाठी अनेक प्रकारचे पर्याय आहेत. यात बहुतांश परतावा वेगवेगळ्या दराने मिळतो. यामुळे गुंतवणूकदार संभ्रमावस्थेत असल्याने तो चुकीच्या प्रॉडक्टमध्ये गुंतवणूक करतो. तसे तर इक्विटीलाच दीर्घ काळासाठी योग्य समजले जात होते. ज्याला कोणाला गुंतवणूक करायची असेल तर ती दीर्घ काळासाठी करावी आणि जास्तीत जास्त करावी. विशेषत: निवृत्तीनंतरचे प्लॅनिंग करणाऱ्यांसाठी.

तथापि शेअर्समध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे. मात्र, तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करावी. एक चांगला पोर्टफोलिओ बनण्यासाठी रक्कमही खूप लागते. उलट म्युच्युअल फंड्समध्ये विविध स्कीम्स असतात. यात गुंतवणूक कमी लागते. यामुळे वेगवेगळे पोर्टफोलिओ तयार होतात. यात केवळ शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकाल. तुमचा करही वाचेल. याशिवाय पीपीएफच्या ईईई श्रेणीमुळे १५ वर्षांपर्यंत तुमचा पैसा सांभाळला जातो. याचा अवधी वाढवताही येतो. जर यात कराचा लाभ धरला तर तो ८.७५ टक्क्यांऐवजी ११ ते १२ टक्क्यांच्या जवळपास मिळतो. नोकरी पेशातील मंडळीसाठी ईपीएफचा फायदा अधिक असतो. तोसुद्धा ईईई श्रेणीतीलच आहे. दीर्घ कालावधीपासून हा चालत आल्याने निवृत्तीनंतरच्या गरजा भागवण्यासाठी यात खूप काही फायदा मिळतो. अन्य गुंतवणुकीसाठी म्हणजे सोने किंवा रियल इस्टेट ते काही वेगळेच आहे. याला या गुंतवणुकीशी तुलना करता येत नाही. जो पैसा तुम्ही गुंतवला आहे त्याला वेळोवेळी रिबॅलन्स केले पाहिजे, त्यायोगे तुमचे धन व्यवस्थित मार्गी लागले पाहिजे.