आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जे मोबाइल आपण भंगारात फेकतो, त्यामध्ये लपलेले असते सोने, वाचा ही बातमी...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
8 नोव्हेंबरला जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींने 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा बंद करण्याची घोषणा केली, तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी जुन्या नोटांची सोने खरेदी केली. ही मागणी पाहूनच एक तोळा गोल्डची किंमत 45 हजार पर्यंत झाली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे लोक मार्केटमधून गोल्ड खरेदी करतात, ते अनेक वेळा अशा वस्तू फेकून देता, ज्यामध्ये गोल्ड लपवलेले असते. त्यांना माहिती नसते की, त्या फेकलेल्या वस्तूमध्ये गोल्ड असते. यामधील एक वस्तू मोबाइलसुध्दा असते. हे खरे आहे, फीचर फोनमध्ये अनेक पार्ट्स असे असतात ज्यामध्ये गोल्ड लावलेले असते. अशा प्रकारे काढू शकता फोनमधील गोल्ड...

एक्सपर्ट सांगतात की, मोबाइलचे अनेक पार्ट्स सोन्याने कोटेड केले जातात. गोल्डची कंडेक्टिविटी सर्वात जास्त असते. चांदीची कंडेक्टिविटीसुध्दा जास्त असते परंतु याचे ऑक्सीकरण असते. यामुळे हे महाग असूनही गोल्डचा वापर या पार्ट्समध्ये केला जातो. ज्वेलरी एक्सपर्ट जिंतेद्र सोनी सांगतात की, गोल्डवर सहज स्क्रॅच येत नाही. मोबाइल मदरबोर्ड, चिपसोबत इतर पार्ट्समध्ये गोल्डचा वापर केला जातो.

अमेरिकेने केला आहे सर्व्हे
यूएस जिओलॉजिकल सर्व्हेमध्ये ही गोष्ट समोर आली आहे की, मोबाइल फोनमध्ये गोल्ड, कॉपर, सिल्वरसोबत प्लॅटिनमचा वापर होतो. या सर्व मेटलचा वापर फोनमध्ये वेगवेळ्या गोष्टींसाठी केला जातो. सर्व्हेनुसार एका फोनमध्ये जवळपास 0.034 ग्राम गोल्डचा वापर केला जातो. ज्याची किंमत जवळपास 250 रुपयाच्या जवळपास असू शकते. याव्यतिरिक्त फोनमध्ये 0.35 चांदी, 0.00034 ग्राम प्लॅटिनम आणि 16 ग्राम कॉपर असते.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणत्या मोबाइलमध्ये असतो गोल्ड आणि हे काढण्याची प्रोसेस...
बातम्या आणखी आहेत...