आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • How To Relieve Stress. Stress. We All Deal With It.

Stress कमी करण्यासाठी दिवसातून 3 वेळेस चेक करा मेल, जाणून घ्या इतर टिप्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज अनेक जणांना ऑफिसमध्ये तासं-तास बसून काम करण्यामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारींचा सामना करावा लागत आहे. कामाचा ताण आणि खाण्या-पिण्याच्या सवयींकडे झालेल्या दूर्लक्षामुळे मानसिक ताण, बॅक पेन, डोळ्यांच्या तक्रारींचा सामन करावा लागत आहे. या सर्व गोष्टींमुळे आज प्रत्येकाची पर्सनल लाइफ डिस्टर्ब होत आहे. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला ऑफिस स्ट्रेस अथवा इतर प्रकारच्या स्ट्रेसला कसे सामोरे जावे आणि आलेला ताण कसा कमी करावा याबद्दल माहिती सांगत आहोत.

स्ट्रेस संदर्भात कॅनडा यूनिव्हर्सिटीचा रिपोर्ट-

तुम्ही जर 24 तासांपैकी केवळ 3 वेळा स्वत:चा ई-मेल चेक केल्यास आलेला ताण कमी होण्यास मदत होईल असा निष्कर्ष कॅनडाच्या यूनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबियाने नुकत्याच केलेल्या एका ताज्या अभ्यासावरून काढला आहे. यामध्ये 124 व्यक्तींवर करण्यात आलेल्या अभ्यासानुसार हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. रिसर्च दरम्यान करण्यात आलेल्या व्यक्तींचे वेग-वेगळे ग्रुप तयार करून त्यांच्या प्रत्येक बारीक सवयींचा अभ्यास करण्यात आला. यातील एका ग्रुपला घरी ई-मेल चेक करण्याची परवानगी देण्यात आली तर दुस-या ग्रुपला ही परवानगी देण्यात आलेली नव्हती.
याआधी जर्मनीतील काही अभ्यासकांनी देखील एक प्रयोग केला होता. या अभ्यासामध्ये असे समोर आले होते की, घरी ऑफिसमधील कामाचे ई-मेल चेक करण्याने आणि फोन कॉल्स घेतल्याने तुमचा वीकेंड खराब होवू शकतो. तसेच यामुळे इन्सोमनिया, डोके दुखी, फेटिग, पोटात दुखण्याचा त्रास होऊ शकतो.

ऑफिस स्ट्रेस दूर करण्यासाठी काय करावे, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...