आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरबसल्या तपासा भेसळयुक्त दूध आणि अन्य खाद्य पदार्थ...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये भेसळ असणे ही सध्या साधारण गोष्ट बनली आहे. दूध, चहापावडर, कॉफी, तुप, मसाले अशा अनेक पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ पाहायला मिळते. ही भेसळ आपल्या आरोग्यासाठी हानीकारक आहे. या पासुन सतर्क राहणे खुप आवश्यक आहे. भेसळयुक्त पदार्थांची तपासणी करण्यासाठी नमून्यांना प्रयोगशाळेत पाठवणे आणि त्यांचे रिपोर्ट मिळवणे ही खुप दीर्घ प्रक्रीया असते. परंतु काही पदार्थांमधील भेसळीची तपासणी आपण घरच्या घरी करु शकतो. जसे की दूध, चहा पावडर, सफरचंद असे अनेक पदार्थ, चला तर मग पाहुया भेसळयुक्त दुध घरच्या घरी कसे ओळखावे...

दूध
1. डिटर्जेट भेसळ
दूधात डिटर्जेंटची भेसळ आहे हे ओळखायचे असेल तर नमुन्याच्या रुपात 10 मिलीलीटर दूध आणि तेवढेच पाणी घ्या. दुधामध्ये पाणी मिसळा. जर दूधामध्ये फेस झाला तर समजुन घ्या की दूधात डिटर्जेंटची भेसळ आहे.

2. कृत्रीम दूधाची ओळख
कृत्रीम दूधाची ओळख म्हणजे या दूधाची चव कडू असते. जेव्हा तुम्ही हे दूध बोटावर घेऊन चोळाल तर तुम्हाला साबणाप्रमाणे स्पर्श जाणवेल. जर तुम्ही हे दूध गरम केले तर या दूधाचा रंग पिवळा होईल.

3. यूरियाची भेसळ
बहुसंख्य दूध विक्रेते यूरीया मिळवुन दूध विकतात. जर दूधामध्ये यूटेज इन्जाइक मिल्क, 5-6 पोटेशियम कार्बेनाइटचे थेंब टाका. जर दूधाचा रंग पिवळा झाला तर समजुन घ्या की, दूधात यूरिया मिळवलेला आहे.

4. स्टार्चची भेसळ
या प्रकारची दूधात भेसळ आहे की नाही हे ओळखण्यासाठी दूधात 5-6 थेंब ओयोडीन टाकल्याने दूधाचा रंग नीळा होतो. असे झाल्यावर समजुन घ्या की यामध्ये स्टार्च मिळवले आहे.
पुढील स्लाईडवर वाचा... सफरचंद, चहा पावडर, मासे, हळद अशा अनेक पदार्थांमधील भेसळ ओळखण्याच्या पध्दती...