आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Here Is A Small Collection Of Hyderabadi Recipes,Try Out Your Hand At Hyderabadi Recipes

बटाट्याची भाजी खाऊन कंटाळलात ट्राय करा हैदराबादी स्टाइलची ही DISH

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबादी पदार्थ केवळ पकवान केवळ चिकण बिर्याणीसाठीच प्रसिद्ध नाहीये. तर या शहरातील शाहाहारी पदार्थ तेवढेच प्रसिद्ध आणि चटकदार आहेत जेवढे मांसाहारी पदार्थ आहेत. आज आम्ही तुम्हाला हैदराबादी शाकाहारी रेसिपीबद्दल माहिती सांगणार आहोत. चला तर मग जाणून घ्या हैदराबादी आलू 65 कसा बनवाया याबद्दल...

साहित्य -

5 बटाटे
3 मोठे कांदे
1/5 कप दही
1/2 चमचा अजीनोमोटो
3 हिरव्या मिर्च्या
मीठ - चवीनुसार
3/4 चमचे लाल मिर्ची पावडर
तेल - गरजेनुसार
2 चमचे बेसन पीठ
1/4 बेकिंग पावडर
1/4 गरम मसाला
1 चमचा लिंबाचा रस
कृती
कुकरमध्ये बटाटे एक शिंट्टी घेऊन शिजवून घ्या. लक्षात ठेवा बटाटे पूर्णपणे शिजवायचे नाहीये. थोडेसे बटाटे शिजल्यानंतर त्यावरील सालं काढून टाकावी. आता बटाटे चौकोनी आकारात कापून घ्यावे. कापलेल्या बटाट्यांवर मीठ,बेकिंग पावडर आणि बेसन पीठ टाकावे. आता एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यावे. बटाटे कुरकुरे होईपर्यंत तळून घ्यावे. बटाटे तळून होईपर्यंत एखाद्या सुती कपड्यामध्ये दही बांधून लटकवून ठेवावे. याने दह्यातील अतिरिक्त पाणी निघून जाईल. कांदा आणि मिर्च्या चिरून एका पॅनमध्ये तेलात तळून घ्यावे. हे तळताना तुम्ही त्यामध्ये अजीनोमोटो टाकू शकतो. कांद्याला फिकट नारंगी रंग येईपर्यंत तळावे. फिकट नारंगी रंग आल्यानंतर त्यामध्ये दही मिसळावे.
तयार झालेल्या मिश्रणात मीठ,लाल मिर्ची पावडर टाकून त्यावर गरम मसाला टाकून चांगले एकत्र करून घ्यावे. मध्यम आचेवर तेल निघेपर्यंत शिजवून घ्यावे. आता या मिश्रणामध्ये शिजवलेले बटाटे एकत्र करावे आणि गरज असल्यास थोडेसे पाणी टाकावे. साधारण 4 ते 5 मिनिटे शिजवून तुम्ही गरमा गरम चटकदार आलू 65 सॉससोबत सर्व्ह करू शकता.
पुढील स्लाइडवर वाचा, बुरानी रायता रेसीपी...