आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारेगार बर्फाचा गोळा खाताय, हे पदार्थ आहेत आरोग्याला धोकादायक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्हाळा आला की थंड पेय पदार्थाच्या विक्रीची दुकाने बाजारपेठेत सजू लागतात. अनेकांची पावले आपसूकच शीतपेयांकडे वळतात. मात्र, ही शीतपेये अथवा बर्फाचा गोळा घेताना त्यात वापरल्या जाणा-या बर्फाच्या गुणवत्तेबाबत शंका कुणालाच येत नाही. ग्रामीण भागातील गावो-गावात तसेच शहरी भागात बर्फ गोळा विकणाऱ्या गाड्याची रेलचेल दिसून येते. उन्हाची उष्णता शमविण्यासाठी बर्फ गोळा विकणाऱ्या गाड्यांजवळ लहान मोठ्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. परंतू बर्फ गोळा खाणे वैद्यकीयदृष्ट्या शरीरास हानीकारक आहे. बऱ्याच बर्फ कारखान्यात बर्फाच्या निर्मितीकरीता दूषीत पाणी उपयोगात घेऊन बर्फाची निर्मिती केली जाते.

रासायनिक रंगांचा वापर
बर्फ गोळ्यात वापरल्या जाणाऱ्या रासायनीक रंग ही निकृष्ठ दर्जाचे असल्यामुळे व त्याचा खाद्यपदार्थात वापर केल्यामुळे घशाचे विकार होऊ शकतात. रासायनिक रंग, निकृष्ट दर्जाचे पाणी आणि सॅकरीनपासून गोळा आणि आइस कँडी तयार केले जाते. दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने खाण्याचे प्रमाणित रंग, साखर महागली आहेत. फेप्सी तयार करण्यासाठी त्यांचा वापर केल्यास उत्पादनखर्च वाढतो. त्याच्या तुलनेत रासायनिक रंग आणि सॅकरीनचा वापर केल्यास निम्म्या खर्चात फेप्सी तयार होत असल्यामुळे निर्माते सर्रास रासायनिक रंग आणि सॅकरीनचा वापर करीत असल्याचे चित्र आहे. यासोबतच गोळ्याच्या र्ंगामध्येसुध्दा याचा वापर केला जातो.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणता बर्फ वापरतात आइस गोळ्यासाठी याचे काय होतात दुष्परिणाम...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...