आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकट्याने ड्रायव्हिंग करण्यापूर्वी लक्षात ठेवा या 6 Safety TIPS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला घरी येण्यास रात्री उशीर होतो. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने अनेक जण (विशेष करून मुली) कार घेवून ऑफिसला जात असल्याचे चित्र पाहण्यास मिळते. गाडी चालवताना प्रत्येक लहान-सहान गोष्टींकडे बारकाईने लक्ष देणे आवश्यक आहे. तुमचे आयुष्य जसे मोलाचे आहे तसेच समोरून येणा-या व्यक्तीचे आयुष्यदेखील मोलाचे आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही जर रोज रात्री एकट्याने गाडी ड्राइव्ह करून घरी येत असाल तर खाली देण्यात आलेल्या टिप्स एकदा अवश्य वाचा.

गाडीची कंडीशन उत्तम ठेवा :
तुम्ही जर नेहमी गाडी एकट्याने ड्राइव्ह करत आणत असाल तर, गाडीची कंडिशन व्यवस्थित आहे की नाही याची शाश्वती अवश्य करून घ्या. रस्त्यामध्ये कुठे अडचण येऊ नये यासाठी वेळेवर गाडीची सर्व्हिसिंग करण्याकडे लक्ष द्या. नियमित गाडीची सर्व्हिसिंग केल्याने मध्येच गाडी खराब होण्याची भिती कमी होईल. तसेच गाडीबद्दलच्या काही बेसिक गोष्टी तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. ही माहिती तुम्ही तुमच्या मेकॅनिक कडून घेऊ शकता अथवा पुस्तकात देखील वाचू शकता. यामुळे जर तुमची गाडी अचानक बंद पडली तर तुम्ही या गोष्टी तपासून पाहू शकता.

इतर टिप्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...