आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In Laws Meeting Is Very Important For Future Relationship So Apply Some Rules To Make Meeting Impressive.

पहिल्या भेटीतच In laws ला Imprese करण्यासाठी वाचा टीप्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिली भेट, डेट आणि प्रेमाचे रुपांतर जर विवाहात होत असेल तर त्याविषयीची एक्साइमेंट फारच निराळे असते. त्याच्या/ तिच्या घरची मंडळी कशी असेल? ते आपल्याला स्विकारतील की नाही? अशा प्रकारचे अनेक प्रश्न अक्षरश: आपल्या भोवती पिंगा घालत असतात. यात जर होणारे 'इन लॉज' अर्थात सासर्‍यांनी बोलावले असेल तर विचारूच नका. नको करायच्या त्या चुकाही अप्रत्यक्षपणे आपल्याकडून होतात. जास्त आकर्षक दिसण्याच्या नादात आपण अनेक चुका करून बसतो. मात्र, नंतर चुका लक्षात आल्यानंतर आपल्याला सगळ्यांसमोर खजीलही व्हावे लागते.
युवक/युवतीने खास अशा मीटिंगपूर्वी व्यवस्थित तयारी करायला हवी. याशिवाय संभाषणादरम्यान काही छोट्या- छोट्या गोष्‍टीकडे जाणीवपूर्वक लक्षही द्यायला हवे. कारण 'फस्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन' हे विसरुन चालणार नाही. आपल्या मुलाची/मुलीची निवड चुकलेली नाही, याची जाणीव आपल्या 'इन लॉज'ला पहिल्या भेटीतच व्हायला हवी.

'सेमी फॉर्मल लूक' असावा...
आपल्या 'ड्रेसअप'मधून आपला स्वभाव, विचार या सारख्या अनेक गोष्टी स्पष्ट होत असतात. युवक/युवतीने इन लॉजला भेटायला जाताना आपल्या पहेरावाविषयी विशेष काळजी घ्यायला हवी. याप्रसंगी सेमी फॉर्मल लुक आत्मसात करावा. युवतींनी ब्यूटी आणि एलिगेंसला रिप्रेजेंट करावे. भडक मेकअप करून जावू नये. केस व्यवस्थित आहेत ना, याची काळजी घ्यावी. युवकांनीही ड्रेसिंगविषयी काळजी घ्यावी.

'इन लॉ' ला इम्प्रेस करण्‍यासाठी आणखी टीप्स वाचण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्लाइडवर...