आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Youth Express Their Feeling Of First Kissing

त्याने घेतले कवेत, नाजूक ओठांवर ओठ, वाचा पहिल्या KISS चे किस्से

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिला किस हा विषय फारच भन्नाट आहे. हा आयुष्यातील असा क्षण असतो जो कोणीही विसरु शकत नाही. लाईफ स्टाईल बदलल्याने आता पहिल्या किसचे परिमाणही बदलले आहेत. पूर्वी नवरा-बायकोमध्येच पहिला किस हा प्रकार घडायचा. पण आता तसे राहिले नाही. लाईफ स्टाईल खुली झाली आहे. विचार बदलले आहेत. कॉलेजच्या दिवसांमध्ये पहिला किस घडलेला असतो. त्यानंतरही बऱ्याच वेळा हा आनंद तरुणाईने लुटलेला असतोच...
पण पहिल्या किसचा अनुभव कुणीही विसरु शकत नाही. तो आयुष्यातील खरंच सुवर्णक्षण असतो. शरीर असं मोहरुन निघतं. अगदी पहिल्या पावसात जमीन भिजून निघावी तसंच... भावना उचंबळून जातात. प्रणय भावना जागृत होतात. असा अमेजिंग असतो हा पहिला किस...
आज आम्ही आपल्यासाठी पहिल्या किसचे अनुभव घेऊन आलोय. तरुणाईने अगदी मोकळेपणाने ते शेअर केले आहेत. वेगवेगळ्या सोशल नेटवर्किंग साईट्सवरुन हे अनुभव घेण्यात आले आहेत... तुमच्या आयुष्यातील त्या मंतरलेल्या दिवसांना या निमित्ताने निश्चितच उजाळा मिळणार आहे...
राणी (मराठी मुलगी)-
मी 16 वर्षांची होते. तेव्हा आम्ही पुण्याला आजीकडे सुट्यांमध्ये गेलो होतो. आमच्या फ्लॅटच्या शेजारी एक पंजाबी मुलगा राहायचा. उंच आणि गोरा होता तो. आजीकडे तो नियमित यायचा. माझी आणि त्याची गट्टी जमली. हळूहळू तो मला आवडू लागला. आमच्यात मस्त गप्पा रंगायच्या. माझ्या सुट्या संपल्या. परतण्याचा दिवस उजाडला. पण मला त्याला किस करायचे होते. मी त्याच्या घरी गेले. घरी कुणीच नव्हते. जरा गप्पा झाल्यावर त्याला अशी घट्ट मिठी मारली. किस करण्यासाठी टाचा उंच केल्या. त्याने चान्य घेत माझ्या मागे हात लावले. मी जरा अवघडलेच. तेव्हा तो म्हणाला, तुझ्या मागच्या खिशातून आवाज येतो. अरे रामा. आईचा फोन... सगळाच खोळंबा झाला. पण हाच माझा पहिला किस असे मी समजते.
आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय, तरुणाईचे पहिल्या किसचे अनुभव... हे अनुभव वाचून तुम्हीही तुमच्या जुन्या दिवसांमध्ये रमाल... पहिला किस आठवाल... पुढील स्लाईडवर क्लिक करा....