आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DIWALI - महिलांसाठी खास इंडो-वेस्टर्न ड्रेसची श्रेणी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवाळीची चाहूल आपल्यापैकी सगळ्यांना लागली आहे. या उत्सवात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच नवीन कपडे खरेदी करत असतात. सध्या बाजारात अनेक प्रकरच्या डिझाइंन्स असलेले अनेक कपडे विक्रिसाठी आले आहेत.पण नेमक्या कोणत्या प्रकारचे ड्रेस खरेदी करायचे हे माहित नसते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला खास दिवाळीसाठी इंडो-वेस्टर्न ड्रेसच्या वेग-वेगळ्या श्रेणींबद्दल माहिती देत आहोत.
लेस बॉटमची साडी
दिवाळीत हेवी ड्रेस खरेदी करायचा असेल, तर नेट साडीवर मल्टिकलर लेस बॉटम ट्राय करा. वरच्या बाजूने बिडवर्क सुंदर दिसेल. साडीचा बॉटम लेसवर्कने खुलून दिसेल. जास्त उजळ रंगांपेक्षा इंग्लिश कलर्स छान दिसतील. ब्लाऊजचा नेक स्टाइल, शर्ट कॉलर ठेवल्यास वेगळेपण दिसेल. साडीचा लूक सेमी-ट्रेडीशनल आहे.