आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पौष्टिक शर्करामुक्त पेये तुम्हाला ठेवतात सुदृढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अति उकडत असेल तर पौष्टिक व गुणधर्माने थंड पेय निवडण्याऐवजी आपण गोड पेयांची निवड करतो. जगात स्थूलता विकार जडण्यासाठी कोला कारणीभूत असून यात नो फूड घटक जास्त आहेत. पोषकद्रव्यांचा अभाव व अतिशर्करा याद्वारे पोटात जाते. अतिशर्करायुक्त कोला- ५५० एमएल च्या कोला बाटलीत अंदाजे १५ चमचे साखर असून २४० उष्मांक(कॅलरी) असतात. एक व्यक्ती पूर्ण दिवसात जितका आहार घेते त्या पैकी १० टक्के. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार दिवसात पाच चमच्यांपेक्षा जास्त साखर खाऊ नये.

ही आहेत रुचकर व पौष्टिक पेये
कोला नाकारणे म्हणजे तुम्ही कोणतीही शीतपेये घेऊ नयेत, असे मुळीच नाही. तुम्ही शर्करामुक्त पौष्टिक व रुचकर पेय निवडू शकता.

१) ताजी फळे व भाज्यांचा रस : फळांतील नैसर्गिक शर्करेचे प्रमाण कमी करण्यासाठी मौसमातील फळे खा. टरबूज, बेल, खरबूज, काकडी, पालक, बीटरूट, पुदिना-लिंबू मिश्र रस घेणे योग्य. त्यामुळे पोषक द्रव्येही मिळतात.

२) दह्याची पेये : लस्सी, ताकासारखी प्रोबायोटिक पेये चांगला पर्याय ठरतात. यामुळे कॅल्शियमची गरज भागते.

३) फळांचा गर : दूध वा ताज्या दह्यात फळांचा गर मिसळा. बर्फाचा चुरा, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, केळी व आंब्याचा गरही वापरू शकता. कॅल्शियमने समृद्ध हा पदार्थ मुलांसाठी योग्य आहे.

४) सातूच्या पिठाचे सरबत : सातूच्या पिठाचे सरबत गोड वा नमकीनही असते. थंड दूध, गूळ टाकून याचे गोड सरबत बनवता येते. भाजलेले जिरे, शेंदी मीठ, लिंबू टाकून याला नमकीन करता येते. हे तंतुमय असल्याने मधुमेहींसाठी लाभदायक आहे.
(क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट/संचालक, होल फुड्स,नवी दिल्ली)
बातम्या आणखी आहेत...