आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायदानात करुणेला स्थान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नुकतीच पुण्यात एक अविश्वसनीय घटना घडली. येथे गणपतीचे फार महत्त्व आहे. अनेक मोठी मंदिरे आहेत. मंडईचे मंदिर श्रीमंत देवस्थानांपैकी एक आहे. एका रात्री मंदिरातील मूर्तीचे सर्व अलंकार चोरीला गेले. वृत्तपत्रे, टीव्ही माध्यमांत याचे मथळे झळकले.
दुसऱ्या दिवशी एक रिक्षाचालक पोलिस ठाण्यात पोहोचला. त्याच्या हाती काही सामान होते व डोळ्यांतून अश्रू वाहत होते. त्याने पोलिसांना ते दागिने दिले व आपल्या मुलाने ते चोरल्याची कबुली दिली. रात्री सोन्याचा हार घालून मद्यधुंद अवस्थेत मुलगा घरी आल्याचे त्याने सांगितले.
सकाळी मंदिरातील दागिने चोरीची वार्ता वाचून रिक्षाचालक हबकून गेला. त्याला हे पाप सहन झाले नाही. त्याने मुलाला घरात डांबले व तो पोलिस ठाण्यात आला. विश्वस्तांनी रिक्षाचालकाला इनाम देण्यासाठी बोलावले. तो म्हणाला, ""आम्ही गरीब आहोत, पण गुन्हेगार नाहीत. माझा मुलगा कुशल प्लंबर आहे. मात्र, वाईट संगतीमुळे तो व्यसनाच्या आहारी गेला आहे. कृपया मला मदत करा.'' विश्वस्तांनी त्याचा प्रामाणिकपणा पाहून मुलाला पोलिसांकडे सुपूर्द केले नाही. बक्षिसाच्या रकमेतून मुलाला व्यसनमुक्त करण्याचा निर्णय घेतला.
न्यायदानाचे हे सर्वोत्तम उदाहरण ठरू शकते. यात अपराधाविषयी नव्हे, तर अपराध्याविषयीची कणव दिसते. अपराधाविषयी विचार केल्यास शिक्षा आठवते. अपराध्याचा विचार केल्यास न्यायाला मानवी पैलू येतो.अपराध व शिक्षेचे दुष्टचक्र काय परिणाम करते, हा मुद्दा महत्त्वाचा आहे.
बातम्या आणखी आहेत...