आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई-वडिलांसह बालकांनाही हृदयविकाराचा धोका, हृदयरोगापासून असे ठेवा स्वत:ला दूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परिवारातील सर्वांनाच हृदयरोग आहे, तर तुम्हालादेखील त्याची भीती असतेच. पण सर्वच प्रकारच्या हृदयरोगात घाबरण्याची आवश्यकता नाही. काही हृदयविकार कुटुंबातील पुढच्या पिढीत जातात. यात कार्डियोमायोपॅथाज सहभागी आहे. यात हृदयाचे शारीरिक स्ट्रक्चर बिघडते. ज्यात हृदय योग्य पद्धतीने रक्ताचे पंपिंग करण्यात अकार्यक्षम ठरते. हार्ट ऱ्हिदम प्रॉब्लम ही दुसरी समस्या आहे. या आजारावर नियंत्रण ठेवणे कठिण होते. यात सुरक्षित राहण्यासाठी योग्य उपचाराची गरज आहे. कोरोनरी आर्टरी डिसिजवर बोलायचे झाले तर कुटुंबातील काही पेशी आमच्या शरीरात येतात. यात बॅड कोलेस्टेरॉलची समस्या उद‌्भवू शकते.
वर्ल्ड हार्ट फेडरेशननुसार, फर्स्ट डिग्री मेल रिलेटिव्हसारखे वडील अथवा भावाला ५५ वर्षे वयाच्या अगोदर आणि ६० वर्षे वयाअगोदर आई अथवा बहिणीला हृदयाचा झटका अाला असेल तर तुम्हीसुद्धा हृदयरोगाच्या विळख्यात येऊ शकता. ५५ वर्षे वयाच्या अगाेदर पालकांना हृदयरोग असेल तर मुलांनादेखील हा रोग उद‌्भवण्याची शक्यता ५० टक्के बळावते. परंतु असे सर्वांच्या बाबतीत नसते. काही रुग्णांचा कौटुंबिक इतिहास खराब असतो, परंतु मुलांचे हृदय हेल्दी असते. हृदयाला आरोग्यदायी ठेवण्यासाठी या गोष्टींकडे लक्ष ठेवा-
फॅमिली हिस्ट्री पाहा
हाय कोलेस्टेरॉल, हार्ट डिसिज या हार्ट अॅटॅकशी संबंधित कुटुंबाचा अभ्यास करा. पालकांच्या हृदयाव्यतिरिक्त बहीण-भावांच्या हृदयांची स्थिती जाणा. जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशनमध्ये प्रकाशित एका लेखानुसार भाऊ-बहिणीला कार्डियोव्हेस्कुलर डिसिज असेल तर तुमच्यातदेखील १०० टक्के वाढू शकतो? याचे उत्तर असे आहे की, भाऊ-बहिणीत एकसारख्या पेशी असण्याशिवाय सर्वच एकसारखे खातात आणि एकसारख्या वातावरणात वाढतात.
नंबर समजून घ्या
वेळोवेळी ब्लड प्रेशर, लिपिड प्रोफाइल आणि ब्लड शुगर टेस्ट करा. कारण हार्ट डिसिजने वय कमी होत आहे. अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडेट्रिक्सचे म्हणणे आहे, परिवारातील पुरुष ५५ वर्षांअगोदर आणि महिला ६५ वर्षांअगोदर हार्ट डिसिजच्या विळख्यात असतील तर मुलांचा दोन वर्षांच्या वयात असताना किंवा १० वर्षांचा होण्याअगोदर कोलेस्टेरॉल तपासला पाहिजे.
आरोग्यदायी आहार घ्या
कमीत कमी चरबी वाढवणारे पदार्थ टाळले पाहिजेत. बेकरी उत्पादनामध्ये फॅट अधिक असतात. हिरव्या भाज्या, फळांवर अधिक भर द्यावा.
नियमित व्यायाम करा
आठवड्यातून पाच ते सहा दिवस कमीत कमी ३० मिनिटे कार्डियो करावा. यात हार्ट रेट वर जाईल. व्यायाम केल्याने वजन आटोक्यात राहील. ज्यात हृदयरोगाचा धोका कमी होईल. धूम्रपान केल्याने कार्डियव्हेस्कुलर डिसिजचा धोका वाढू शकतो. जेव्हा दुसरा धूम्रपान करीत असेल तर तेथे उभे राहणेदेखील टाळावे.
ब्लड शुगरवर ठेवा कंट्रोल
तुम्हाला मधुमेह असेल तर औषधोपचार नियमित घेऊन मधुमेहावर नियंत्रण ठेवा. वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेत जीवनशैलीवर विशेष लक्ष द्या.
बातम्या आणखी आहेत...