आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: खुप घाम येत असेल तर सावध व्हा, करा हा उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्हाळ्यात घाम येणे सहाजीक गोष्ट आहे. परंतु अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांना इतर व्यक्तींच्या तुलनेत भरपूर घाम येतो. त्यांचा शर्ट घामाने इतका भरलेला असतो जसे ते नुकतेच अंघोळ करून बाहेर पडले आहेत. ज्या व्यक्तींना भरपूर घाम येतो अशा व्यक्ती हायपरडायड्रोसिसचे शिकार होण्याची दाट शक्यता असते. पण यामुळे काळजी करण्यासारखे काहीच नाही. आज आम्ही तुम्हाला काही उपायांबद्दल सांगणार आहोत जे तुम्हाला तुमच्या शरीरातून बाहेर पडणारा घाम कमी होण्यास मदत करेल व हायपरडायड्रोसिस होण्यापासून बचाव करेल.
भरपूर पाणी प्या...
तुम्हाला इतर व्यक्तींच्या तुलनेने जर जास्त घाम येत असेल तर भरपूर पाणी प्या. असे केल्याने तुमच्या शरीरात पाण्याची योग्य पातळी नियंत्रित राहिल. भरपूर पाणी प्यायल्याने हायपरडायड्रोसिसचा त्रास होण्यापासून बचाव केला जाऊ शकतो.
वजन वाढण्यापासून सावध राहा...
बहूतेक व्यक्ती त्यांच्या खाण्या-पिण्याच्या सवयींवर कंट्रोल करू शकत नाही, ज्यामुळे वजन वाढण्याची समस्या निर्माण होते. अतिवजन हे देखील जास्त घाम येण्याचे एक कारण आहे. त्यामुळे सर्वात पहिले तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर कंट्रोल ठेवा तसेच नियमितपणे व्यायाम करा. मसालेदार पदार्थ खाणे टाळा, अल्कोहोल आणि चहा-कॉफीचे सेवन कमी करा, सूती कपडे घाला व सर्वात महत्वाचे तणाव मुक्त राहण्याचा प्रयत्न करा.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा कसे वाचाल घामाच्या दूर्गंधीपासून...