आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य : मधुमेहाच्या विळख्यात जग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
द लॅसेंट डायबिटिस अँड एंडोक्रिनोलॉजीमध्ये प्रसिद्ध झालेल्या एक अहवालात म्हटले आहे की, मधुमेह नियंत्रणासाठी घेण्यात येणाऱ्या औषधीमुळे हदय निष्क्रिय होण्याची शक्यता वाढते. तसाही मधुमेहाचा धाेका कमी नाही. मधुमेह रोग मोठ्या प्रमाणात पसरत आहे.
मधुमेहाचा भारतात सारखा प्रसार होत आहे. हा रोग केवळ आपल्या देशातच नाही तर संपूर्ण जगात पसरत आहे. जग त्याच्या विळख्यात सापडले आहे. ताज्या आकडेवारीनुसार जगात १२ आजारी लोकांपैकी एक मधुमेहाचा रुग्ण आहे. हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. भारतात टाइप-२ मधुमेह वेगाने वाढत आहे. अनुवांशिकता, बदलेली जीवनशैली,आहारात वाढलेल्या कॅलरीचे प्रमाण आणि व्यायाम न करणे ही मधुमेह होण्यामागची प्रमुख कारणे आहेत.
३८ कोटी रुग्ण आहे : ५५ टक्क्यांपर्यंत वाढणार

युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट एंजलियाच्या ताज्या अभ्यासानुसार सध्या जगात मधुमेहाचे सुमारे ३८.७ कोटी रुग्ण आहे. हा अभ्यास २०१३ च्या आकडेवारीवर आधारलेला आहे. आता ही संख्या अजून वाढली आहे. २०३५ पर्यंत मधुमेहाचे जगात सुमारे ५९.२ कोटी रुग्ण राहील. अर्थात येत्या दोन दशकांत रुग्णांच्या संख्येत ५५ टक्के वाढ होईल. जगात वाढणारे शहरीकरण, खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयी आणि शरीराचा व्यायाम न होणे हे मधुमेह वाढण्याचे प्रमुख कारण मानले जाते. यामुळे या आजाराचे रुग्ण सारखे वाढतच आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, का पसरत आहे भारतात मोठ्या प्रमाणात भारतात मधूमेह...