आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुवाहाटी शहरापासून थोड्याच अंतरावर वसले आहे आत्मिक शांती देणारे हे मंदिर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आसाममधील गुवाहाटी शहरापासून थोड्याच अंतरावर कामाख्या मंदिर आहे. देवींच्या शक्तिपीठापैकी येथील मंदिराला विशेष महत्त्व आहे. कामाख्या मंदिराचा परिसर नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. सहकुटुंब सुट्या घालवण्यासाठी हे शांत, निसर्गरम्य ठिकाण आहे.
हिंदू धर्मात देवांचे जेवढे स्थान आहे, तेवढेच स्थान देवींचे आहे. त्यामुळेच प्राचीन काळापासून “शक्तिपीठां'चे खूप महत्त्व राहिले आहे. आसामस्थित कामाख्या मंदिर सर्व शक्तिपीठांमध्ये अद्वितीय आहे. हे मंदिर गुवाहाटीच्या निलांचल पर्वतरांगेच्या शिखरावर आहे. मंदिरावरून संपूर्ण शहराचे मनोहारी दृश्य दिसते. परिसरात कालभैरव, भगवान शिव आणि श्री गणेशासह अनेक देवी-देवतांची मंदिरे आहेत. धार्मिक स्थळांच्या व्यतिरिक्त कामाख्या मंदिराच्या जवळपास अनेक सुंदर नैसर्गिक स्थळे आहेत. येथे आपणास वन्यजीवन आणि आदिवासींची जीवनशैलीही खूप जवळून पाहता येईल.
कामाख्या मंदिराचे महत्त्व

८ व्या ते १७ व्या शतकादरम्यान या मंदिराच्या तंत्र साधनेला खूप महत्त्व आहे. पावसाळ्यात मंदिरात एक वार्षिक पर्व अंबुवाची यात्रेचे आयोजन केले जाते. ही यात्रा चार दिवस चालते. यादरम्यान येथे सामान्य भक्तांशिवाय भारत, बांगलादेश, तिबेट आणि दक्षिण आफ्रिकेपर्यंतचे लोक ज्योतिषविद्या शिक्षणासाठी येत असतात.