आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनशैलीतील उणिवांमुळे गर्भधारणेला उशीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कित्येक महिला स्वत:च्या जीवनशैलीबद्दल साशंक असतात. यामुळेच मातृत्वसुखापासून वंचित असल्याची त्यांची तक्रार असते. याविषयी अनेक प्रश्नही विचारले जातात. ही वास्तविकताही आहेच. जीवनशैलीतील असंतुलन मातृत्वसुखापासून वंचित ठेवते.
जन्मत:च प्रत्येकीला निश्चित अंडाणूंची देण असते. वयोमानाप्रमाणे अॅपोपटोसिस, अॅट्रेसिया प्रक्रियेनुसार यांचे प्रमाण कमी होत जाते. रजोनिवृत्तीनंतर याची निर्मिती पूर्णत: थांबते. आपली जीवनशैली गर्भाशयातील अंडाणूंच्या दर्जा व प्रमाणावर प्रभाव टाकते हे अनेक संशोधनांद्वारे सिद्ध झाले आहे. वजनातील वाढ हे याचे प्रमुख कारण समोर आले आहे. स्थूलता आणि वजनातील अति घट या दोन्ही कारणांनी फर्टिलिटी कमी होते व हार्मोनल असंतुलन निर्माण होते. त्यामुळे पाळणा आणखी लांबत जातो.

२५ पेक्षा अधिक आणि १९ पेक्षा कमी बीएमआय असलेल्या महिलांमध्ये गर्भधारणेला अधिक वेळ लागतो, असे ब्रिटनमध्ये झालेल्या एका संशोधनात दिसून आले. त्यामुळे नियमित व्यायाम आवश्यक आहे. पौष्टिक आहाराची जोड याला हवीच. त्यामुळे वजन आटोक्यात राहते. धूम्रपानही गर्भधारणेतील मोठा अडथळा आहे. अॅक्टिव्ह आणि पॅसिव्ह दोन्ही प्रकारचे धूम्रपान महिलांच्या अंडाणूंच्या दर्जा व प्रमाणाला प्रभावित करते. धूम्रपानामुळे आेव्हेरियन रिझर्व्ह लवकर संपू लागतात. अशा स्थितीत वेळेपूर्वी ४ वर्षे रजोनिवृत्ती येते.
महिलांची गर्भधारणा क्षमता वयाच्या ३५ नंतर कमी होऊ लागते. त्यानंतर गर्भधारणेत व्यत्यय येण्याची शक्यता वाढते. जेनेटिक अॅबनॉर्मेलिटी आणि स्पाँटेनियस अबॉर्शनचे प्रकार मातेचे जास्त वय, अंडाणूंचा खराब दर्जा यामुळे घडतात. त्यामुळे मातृत्वाचा निर्णय योग्य वेळी घ्या.

मानसिक ताण, अति मद्यपान, कॅफिन किंवा अति विलासी जीवनशैलीदेखील पाळणा लांबणीवर पडण्याच्या प्रमुख कारणांपैकी आहेत. अनेकदा प्रदूषित वातावरण, रासायनिक द्रव्यांचा संपर्क, हिपॅटायटिस, एचआयव्हीसारखे संसर्ग, पेल्व्हिक संक्रमण, एसटीडीदेखील गर्भधारणेत अडथळे ठरतात.
बातम्या आणखी आहेत...