आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बकिंगहम पॅलेसपेक्षा चारपट विशाल आहे वडोदराचे लक्ष्मी विलास पॅलेस, पाहा PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
19 नोव्हेंबरपासून 25 नोव्हेंबर या काळात नॅशनल हेरिटेज वीक साजरा केला गेला. यासोबतच वडोद-याचा 506 वां स्थापना दिवस साजरा केला जात आहे. 18 व्या शतकात जेव्हा इंग्रचांनी हे पॅलेस पाहिले तर त्यांना आश्चर्य वाटले. कारण हे त्यांच्या बकिंगहम पॅलेसपेक्षा चारपटीने विशाल होते. त्या काळात ही देशातील सर्वात महागडी इमारत होती. लक्ष्मीविलास वॅलेसचे वैभव...

लक्ष्मी विलास पॅलेस:
लक्ष्मी विलास पॅलेस हा गुजरातमधील प्रसिध्द ठिकाणांपैकी एक आहे. या पॅलेसची निर्मिती सयाजीराव गायकवाड (तीसरे) यांनी १८९० मध्ये केली होती. हा पॅलेस एवढा विशाल आहे की याचा अंदाज यावरून लावता येतो, की या पॅलेसच्या आवारात ब्रिटनचा सर्वात मोठा बकिंघम पॅलेससारखे चार पॅलेस लक्ष्मी विलास पॅलेसच्या आवारात उभे राहू शकतात. या पॅलेसच्या परिसर जवळपास 700 एकर भूभागात पसरला आहे. या परिसरात क्रिकेट मैदान, एक इनडोअर टेनिस कोर्ट, बॅडमिंटन कोर्ट,एक संग्रहालय आणि गोल्फ कोर्ससुध्दा आहे. या गोल्फ कोर्सवर फक्त बडोद्यातील अतिश्रीमंत लोकांनाच गोल्फ खेळायला परवानगी आहे.

पुढील स्लाईडवर वाचा, काय काय आहे या पॅलेसच्या परिसरात ...
बातम्या आणखी आहेत...