आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेट्रो शहरांमध्ये Live-in Relationship चा ट्रेंड वाढण्याची ही आहेत 8 कारणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्नाचा निर्णय घेणे अतिशय कठिण काम आहे. तुमचा एक निर्णय जबाबदाऱ्यांना दुपटीने वाढवितो. अशा स्वरुपाच्या जबाबदाऱ्या या वयात पेलणे शक्य नसते. यावेळी बऱ्याच गोष्टी मॅनेज कराव्या लागतात तर काहींकडे दुर्लक्ष करावे लागते. वाईफसोबत तिचे कुटुंबही आपल्याशी जोडले जाते. त्यांच्याशी आश्वासक नाते जोडणे आवश्यक असते. लग्न जर अरेंज असेल तर मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. कारण यावेळी दोघेही एकमेकांपासून पुरते अनभिज्ञ असतात. अशा वेळी एकमेकांच्या सवई माहीत नसतात. सध्या शिक्षणामुळे आणि नोकरीत स्थीर होण्यासाठी बराच कालावधी लागतो. तोपर्यंत बरेच वय वाढलेले असते. अशा वेळी शारीरिक आकर्षक खुणावत असते. शिवाय दोघांनी एकत्र राहिल्याने होणारा खर्च निम्मा होणार असतो. त्यामुळे मेट्रो शहरांमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपचा ट्रेंड वाढत आहे. आम्ही आपल्यासाठी असा ट्रेंड वाढण्यामागची प्रमुख 8 कारणे घेऊन आलोय.

1- जबाबदारीचे दडपण नाही
लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये जबाबदारीचे कोणत्याही प्रकारचे दडपण नसते. या रिलेशननंतर लग्न करण्याचा निर्णय झाला तर ठिक नाही तर दोघेही वेगवेगळे होण्याची मानसिक तयारी करुन आले असतात. फॅमिली फंक्शन, नातलग घरी येणे, त्यांची सरबराई, पुजा-पाठ आदी गोष्टी यात नसल्याने दोघेही हे नाते एन्जॉय करीत असतात. शिवाय यात स्वयंपाक करावे लागणे, घरची कामे करणे, घरासाठी बाहेरची कामे करणे अशी जबाबदारी कुणावरही नसते. दोघेही घरासाठी कॉन्ट्रिब्युट करीत असल्याने आर्थिक जबाबदारी कुणा एकावर येत नाही.

Other benefits: आर्थिक टेंशन फ्री, लग्नाच्या आधीचा डेमो, आदर टिकून राहतो, स्वातंत्र्य, दोघांमधील ताळमेळाची परिक्षा, नात्याबाबत क्लिअर व्हिजन, ब्रेक-अप सहज शक्य.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या, Live-in Relationship चा ट्रेंड वाढण्यामागची इतर कारणे....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...