आज मकर संक्रांती आहे. या थंडीच्या दिवसात स्निग्ध पदार्थ खावे असे म्हटले जाते. याच कारणामुळे मकर संक्रांतीला तिळ गुळाचे पदार्थ तयार केले जातात. मकर संक्रांतीला तीळाच्या लाडवांना बाजारात प्रचंड मागणी असते. हे या दिवसात आरोग्यासाठी खुप चांगले असते. यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही खास रेसिपी घेऊन आलो आहोत. चला तर मग पाहूया हे कोणते पदार्थ आहेत...
तीळाचे लाडू
- 250 ग्रॅम तीळ
- 500 ग्रॅम खवा
- 500 ग्रॅम पीठी साखर
- अर्धा चमचा वेलची पावडर
कृती
तीळ स्वच्छ करून कढईत भाजा. हलका गुलाबी रंग झाल्यावर गॅस बंद करा.
हलक्या हाताने कुटून घ्या. कढईत खवा भाजून घ्या.
थंड झाल्यावर त्यात पीठी साखर, तीळ व वेलची पावडर मिसळून लाडू वळून घ्या.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा अशाच काही स्वीट रेसिपी...