आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा - वेगळेपण आणण्यासाठी चाकोरीच्या बाहेर जाऊन विचार करा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - डमी पिक
वन टू वन कम्युनिकेशन : पाचवर्षांचा एक मुलगा चेन्नईच्या रस्त्यावर वाहतूक सिग्नल्सजवळ फिरत राहतो. भिकारी समजून अनेक दुचाकी वाहनधारक त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. मात्र, लाल दिवा लागल्यावर हेल्मेट घातलेली व्यक्ती दिसताच तो त्याला एक पॉम्प्लेट देतो आणि म्हणतो, ‘काका, प्लीज हेल्मेट घाला. ती तुमच्यासाठी आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी आहे.’ यानंतर एकतर त्या माणसाचे डोळे पाणावतात किंवा तो शरमेने मान खाली घालतो. त्या मुलाचे नाव आकाश आहे. तो चेन्नईमध्ये जुन्या महाबलीपुरम रोडवर पीएसबीबी मिलेनियम स्कूलमध्ये यूकेजीला आहे. आतापर्यंत त्याने रस्ता सुरक्षेवर ६०,००० पॉम्प्लेट वाटले आहेत. त्याने हे काम करण्याचे कसे काय सुचले?

उदाहरण बनणे : सातमहिन्यांपूर्वी आकाश आपले आई-वडील व्ही. आनंदन आणि योगलक्ष्मी यांच्यासोबत दुचाकीवरून घरी येत होता. त्यांच्या अगदी समोर असलेल्या दुचाकीस्वाराला एका वाहनाने धडक दिली. डोक्याला गंभीर इजा झाल्याने तो मरताना त्याने पाहिले आणि ‘हेल्मेट घातले असता तर तो वाचला असता’ हे वडिलांचे बोल त्याच्या मेंदूत फिट बसले. दंड केल्यानंतरही नियम सर्रासपणे मोडले जातात, परंतु या मुलाच्या मोहिमेने मोठा बदल घडवून आणला. काही लोक त्याच सिग्नलवर येऊन आकाशला भेटतात आणि म्हणतात, ‘हे बघ आम्ही हेल्मेट खरेदी केले आहे आणि घालतोदेखील.’
मिसाल कायम करणे : सर्वांना माहीत असेल की, स्ट्रॉबेरी आणि डोंगरांचे घनिष्ट नाते असते. स्ट्रॉबेरी वाळवंटातही असू शकते, असा विचार तुम्ही कधी केला का? एका आठवी पास व्यक्तीने या धारणा चुकीच्या असल्याचे सिद्ध केले.

राजस्थानातील चित्तौडगड जिल्ह्यापासून ४० किलोमीटरवरील बांगडेदा मामदेव गावात जगदीश प्रजापत १० गुंठे जमिनीवर स्ट्रॉबेरीची शेती करत आहेत. त्यांच्या स्ट्रॉबेरीचा पुरवठा पंचतारांकित हॉटेल्सपासून ते उदयपूर, जयपूर, आग्रा आणि दिल्लीपर्यंत होतो. त्यांच्या शेतातील स्ट्रॉबेरी पहिल्यांदा २०० ते २५० रुपये किलो दराने विकली जात आहे आणि दररोज सरासरी १०० किलो स्ट्रॉबेरी पॅक होते. जगदीश यांनी गेल्या वर्षी फक्त एक गुंठ्यामध्ये स्ट्रॉबेरीची लागवड करून एक प्रयोग केला होता. एका मोसमात लाख रुपये कमावल्यामुळे त्यांचा उत्साह आणखी वाढला. त्यांनी मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरीची लागवड करण्याचा निर्णय घेतला आणि ऑक्टोबर २०१४ मध्ये त्यांनी आणखी विस्तार केला. त्यांनी स्ट्रॉबेरीची रोपे आणि पॅकेजिंग मटेरियल नाशिक आणि सांगलीसारख्या थंड ठिकाणाहून घेतली. या रोपांनी त्यांना श्रीमंत, तर बनवलेच, पण आज ते लोकांना रोजगारही देत आहेत.

जनसंवाद:तुम्ही सिग्नलवर नेहमी आपल्या कारची काच वर करून त्यांच्याकडे कानाडोळा करता किंवा काही नाणी देता किंवा ५-१० रुपये देऊन त्यांच्यापासून दूर जाता. त्यांना पाहण्याची तुमची इच्छा नसते. मात्र, टीव्हीवरील एक मिनिटाच्या जाहिरातीमध्ये तृतीयपंथी तुम्हाला सीट बेल्ट बांधण्याचा सल्ला देतात तेव्हा तुमची नजर त्यांच्यावरून हटत नाही.
चेन्नई पोलिसांनी ही जाहिरात जनहितार्थ प्रसारित केली आहे.
जाहिरात सुरू होताच एक तृतीयपंथीय म्हणतो, ‘तुम्ही आपल्या गाडीचे पायलट बनण्याचा प्रयत्न करत असाल, तर पायलटप्रमाणेच सुरक्षा नियमांचे पालन करा. तुमच्या गाडीमध्ये ऑक्सिजन मास्कही नाही आणि लाइफ जॅकेटही नाही, पण सीट बेल्ट आहे. मग तुम्ही तो का बांधला नाही? मी तुम्हाला बांधण्यास शिकवू का?’
फंडा हा आहे की...
बदल घडवून आणण्यासाठी तुम्हाला फक्त वेगळ्या पद्धतीने काम करण्याची गरज असते.