आजच्या काळात ब्रा परिधान करणे सामान्य बाब आहे. पण, 200 ते 300 वर्षांपूर्वी महिलांना ब्रा घालायला भीती वाटत होती. मात्र, कालांतराने ही भीती दूर झाली आणि ब्रा बदलत गेली. त्याचीच खास माहिती divyamarathi.com च्या वाचकांना...
कधीपासून होतेय आधुनिक 'ब्रा'चे उत्पादन
> 1930 पूर्वी ब्रा घालण्याची पद्धत एवढी रुढ नव्हती.
> केवळ श्रीमंत आणि राजघराण्यातील स्त्रीयाच ब्रा परिधान करत.
> 1930 नंतर सर्व सामान्य स्त्रीसाठी ब्राची निर्मिती व्हायला लागली.
> त्या पूर्वी 30 मे 1889 ला फ्रान्समध्ये हरमिनी काडोले यांनी आधुनिक ब्रा बनवल्याचा उल्लेख आहे. त्याला 'कोर्सेलेट जॉर्ज' नावाने ओळखले जात असे.
> लंडनच्या विज्ञान संग्रालयात 'पुश अप' ब्रा ठेवलेली आहे. तो 19 व्या शतकाच्या सुरुवातीची आहे.
महिला ब्रा घालायला का घाबरत ?
19 व्या शतकापूर्वी डॉक्टरांनी सांगितले की होती की ब्रा घालण्याने रक्त प्रवाह थांबू शकतो, पोट बिघडू शकते. त्यामुळे महिला ब्रा घालायाला घाबरत असत. त्या पूर्वी 150 ते 200 वर्षांपूर्वी प्राण्यांच्या कातडीपासून ब्रा बनत. त्या घालायला खूप वेळ लागे. घातल्यानंतरही खूप त्रास होत होता. त्यामुळे त्या काळच्या महिलासुद्धा ब्राला घाबरत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, जुन्या काळातील ब्राचे दुर्मिळ फोटोज आणि वाचा कशी बदलत गेली ब्रा...