आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा Immune System बिघडून शरीराविरोधी काम करते, वाचा कारणे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मानवी शरीरातील व्याधी प्रतिरोधक प्रणाली ही अनेक रोगांविरुद्ध लढून शरीर रोगमुक्त ठेवण्यास व कुठल्याही आजाराचा प्रतिकार करण्यास कारणीभूत असते. ही व्याधी प्रतिरोधक शक्ती कुठल्याही कारणामुळे जर कमी झाली, तर वरचेवर सर्दी, ताप, खोकला, पोटदुखी अशी लक्षणे व आजार शरीरावर वारंवार दिसून येतात, परंतु कधी कधी शरीरातील ही व्याधी प्रतिरोधक शक्ती विपरीत कार्य करण्यास सुरुवात करते व ती स्वत:च्या शरीरातील पेशींविरुद्धच कार्य करण्यास सुरुवात करते. अशा बिघडलेल्या Immune System च्या प्रभावाखाली शरीरातील अनेक पेशी व अवयव येतात व त्यांचे कार्य बिघडून काही आजार उत्पन्न होतात, अशा आजारांना Auto Immune Diseases असे म्हटले जाते. रुमॅटाइड आर्थ्रायटिस हादेखील अशाच प्रकारचा एक आजार आहे. आयुर्वेदानुसार रुमॅटाइड आर्थ्रायटिस या आजाराला आमवात असे म्हटले जाते व हा आजार प्रामुख्याने वात प्रकोप व मंद जठराग्नीमुळे उत्पन्न होतो.
वात दोष हा शरीरातील अवयवांच्या हालचालींसाठी कारणीभूत असतो. आमवातामध्ये सांध्यामध्ये सूज, वेदना, उष्णता व लालसरपणा अशी लक्षणे मुख्यत: दिसून येतात. आयुर्वेदिक संहिताग्रंथांनुसार या आजारची सुरुवात ही पचनसंस्थेपासून होते. सेवन केलेल्या आहाराचे मंद जठराग्नीमुळे जर योग्य पचन झाले नाही, तर त्याचे रूपांतर हे आम (Toxins) मध्ये होते.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, आमवाताची लक्षणे, कारणे आणि उपाय...
बातम्या आणखी आहेत...