आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पांच्या स्वागतासाठी बनवा स्पेशल पनीर मोदक, 11 चविष्ट रेसिपी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज बाप्पांचे आगमन होणार आहे. बाप्पांच्या स्वागताचा उत्साह घराघरात दिसुन येत आहे. तुम्ही देखील आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागताची तयारी करत आहात ना... मग बाप्पांना खुश करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत पनीर मोदक रेसिपी... एकदम स्वादिष्ट आणि बाप्पांना आवडणारे मोदक बनवा. आपला आनंद व्दिगुणीत करा. चला तर मग उशीर कसला करताय... बाप्पांचे आगमन होण्याअगोदर बनवा विविध प्रकारचे मोदक...
पनीर मोदकासाठी साहित्य-
- दीड वाटी मावा
- पनीर आर्धी वाटी
- २ वाट्या पिठीसाखर
- वेलायची पावडर
- थोडे केसर
- पाऊण वाटी किसलेले खोबरे...
कृती
- मावा मंद आचेवर कोरडा होईपर्यंत परता आणि बाजूला ठेवा.
- पनीरला हाताने बारीक करा आणि केसर टाकून 2-3 मिनीट थोडे लालसर होईपर्यंत परतून घ्या.
- आता पनीर थंड झाल्यास त्याल 2 चमचे साखर टाका. आणि छोटे-छोटे गोळे बनवा.
- थंड झालेल्या माव्यामध्ये वेलायची आणि साखर टाकून एकत्र करा. पनीर आणि माव्याचे सारखेच गोळे बनवा. माव्याचा एक गोळा हातावर घेऊन त्याची वाटी बनवा आणि त्यात पनीरचे मिश्रण टाकून बंद करा.
- सर्व बनवलेल्या गोळ्यांना अशाप्रकारे मोदकांचा आकार द्या.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या बाप्पांच्या स्वागतासाठी अजूुन कोण-कोणत्या प्रकारचे मोदक तयार करता येऊ शकतात... चॉकलेट मोदक, खवा मोदक, पेढा मोदक, रवा मोदक, तीळाचे मोदक, उपवास मोदक, फ्राय मोदक, मुगडाळ मोदक, पारंपारिक उकडीचे मोदक, कणकेचे मोदक....
बातम्या आणखी आहेत...