साधारणपणे लहान मुले खोटे बोलतात. त्यांना त्याबद्दल शिक्षा केली जाते, रागवले जाते. पण मोठ्या व्यक्तीदेखील खोट बोलतात त्याचे काय. तुम्हाला असे वाटत असेल की, मुलांना रागवल्यावर, मारल्यावर त्यांची खोटे बोलण्याची सवय कमी होईल. तर तसे बिलकूल नाहीये. त्यांना रागावण्याऐवजी नेमके कोणत्या कारणामुळे तुमची मुले खोट बोलत आहेत हे जाणून घेतल्यास योग्य ठरेल. आज आम्ही तुम्हाला लहान मुले खोटे बोलायला कसे शिकतात याची काही कारणे सांगणार आहोत.
1- पालकांनी लक्ष द्यावे मुलांवर
मुले ज्या गोष्टींना चुकीचे मानतात आणि ती गोष्ट त्याच्या हातून घडली असेल तर मुले खोट बोलतात. तर अनेक वेळा काही चुकीचे केलेले नसताना देखील खोट बोलत असतात. याचे कारण कोणी
आपल्याला चुकीचे समजू नये. असे जर तुमचा पाल्य करत असेल तर तुम्हाला त्याच्या वागण्या बोलण्याकडे बारकाइने लक्ष देणे गरजेचे आहे. पालकांनी आपण कधी मुलांसमोर खोटे बोललो आहोत का या गोष्टीचा देखील विचार यावेळी करणे आवश्यक आहे.