आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • N.Raghuraman Article On Materialist At Divya Marathi

मॅनेजमेंट फंडा: बुद्धिमानाला भौतिकवादी होण्याची गरज नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फंडा हा आहे की, शिक्षण केवळ भौतिक सुख-सोयी मिळवण्यासाठीच नसते, तर याच्या माध्यमातून मानवतेला समृद्ध आणि बलशाली बनवण्यासाठी खूप काही करता येऊ शकते आणि हाच याचा खरा उद्देश आहे.
पहिली कथा:
आपलीजमीन एसआयईएस महाविद्यालयाच्या मुलांसाठी देऊ नका, त्याचा दुरुपयोग केला जाईल, असे अनेक लोकांनी नवी मुंबई येथील अलीबाई पारदी यांना सांगितले. मात्र, त्यांनी कोणाचेच ऐकले नाही. कर्जतपासून सुमारे 18 किलोमीटरवरील कवाठेवाडी येथे त्यांची जमीन आहे. येथे 550 घरे असून बहुतांश लोक डोंगर-कोळी आदिवासी समाजाचे आहेत.2013 पासून तेथे एसआयईएस महाविद्यालयाची मुले आणि शिक्षकांनी गावकऱ्यांच्या भल्यासाठी काम करण्यास सुरुवात केली आहे. आज गावामध्ये दोन हजार चौरस फुटांचा कम्युनिटी हॉल, विटांपासून बनलेले घर, तीन टॉयलेट बॉक्स आणि सहा बोअरवेल आहेत. गावातील कचरा आणि शेण इत्यादी डम्प करण्यासाठी कंपोस्ट पीट आहे. तेथे जैविक खत तयार केले जाते.
महाविद्यालयाच्या बायोकेमिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांनी येथे जमिनीसाठी फायदेशीर असणारे खत तयार करण्यास सुरुवात केली. केमिस्ट्री आणि मायक्रोबायोलॉजीच्या विद्यार्थ्यांनी वॉटर ट्रीटमेंट प्लांट लावला. विहिरीतील पाणी कसे स्वच्छ ठेवता येईल, हे गावकऱ्यांना शिकवले. शाळेतील मुलांनी गावकऱ्यांना बेसिक इंग्रजी शिकवली. ही मुले एकत्रितपणे गावात रेन वॉटर हार्वेस्टिंगवर काम करत आहेत. बीकॉमच्या विद्यार्थ्यांनी गावातील पुरुषांना छोट्या कुटुंबाचे फायदे सांगितले. परिणामी गेल्या वर्षी गावात 23 मुलांचा जन्म झाला होता आणि या वर्षी फक्त 17 मुले जन्मली. बालविवाहास गावकऱ्यांनी पूर्णपणे नाकारले आहे. गावातील 85 टक्के मुली-मुले शाळेत जात आहेत. म्हणजेच अलीबाई पारदी यांनी जे स्वप्न पाहिले होते ते साकार होत आहे.
दुसरीकथा:
तांगासोलहे गाव पश्चिम बंगालमधील पश्चिम मिदनापूर जिल्ह्यात आहे. आयआयटी खडगपूर येथून पाच किलोमीटर दूर. पक्ष्यांसह येथे लहान मुलांचा किलबिलाट दूरपर्यंत ऐकायला मिळतो. पाहताक्षणी ही शाळा सामान्य वाटते. मात्र, असे नाही. ही शाळा सरकारने किंवा एखाद्या कंपनीने उघडलेली नाही, तर आयआयटी खडगपूरची मुले ती चालवत आहेत. म्हणजेच ही शाळा लहान मुलांसाठी इमोशनल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आयआयटी खडगपूरच्या मुलांनी 2008 मध्ये येथे जागृती विद्या मंदिर सुरू केले. या शाळेपर्यंत पोहोचणे आजही खूप कठीण आहे. मात्र, आयआयटीचे विद्यार्थी दररोज सायकलने इथपर्यंत येतात आणि शाळेत येणाऱ्या जवळपास 185 गरीब निराधार मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकवतात. शाळेच्या वर्गांमधील भिंतींवर उत्कृष्ट चित्रे पाहायला मिळतात. तीदेखील आयआयटीच्या विद्यार्थ्यांनीच काढलेली आहेत. ते लहान मुलांनादेखील चित्रे काढण्यास आणि रंगांशी खेळण्यास शिकवतात, पण भिंतींवर नव्हे तर आपल्या लॅपटॉपवरील पेंट-ब्रशच्या माध्यमातून.
मुलेदेखील तासन‌्तास संगणकाशी खेळत राहतात. आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी ‘योगदान’ या नावाने निधी गोळा करण्यासाठी मोहीम चालवली होती. याच्या माध्यमातून मिळालेल्या पैशातून या शाळेची स्थायी इमारत बांधण्यात आली. येथे चार वर्ग आहेत. दोन एकर जागेत शाळेचा परिसर आहे. गार्ड रूम वेगळ्याने आहे. या कसरतीमध्ये आयआयटीच्या मुलांची मदत तियारा फाउंडेशन ट्रस्टही करत आहे. आयआयटीतर्फे हर्षिता चौधरी या अभियानाची प्रमुख आहे. बिहारमधील समस्तीपूरची राहणारी हर्षिता फक्त 19 वर्षांची आहे. मात्र, तिचा निर्धार पक्का आहे. तिच्यासोबत 25 आयआयटीयन्स आहेत. त्या सर्वांची अशी इच्छा आहे की, त्यांच्या शाळेतील मुलांनी एकेदिवशी आयआयटीत प्रवेश घ्यावा.