आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • N.Raghuraman Article On Success At Divya Marathi

मॅनेजमेंट फंडा: श्रेय मिळो अथवा मिळो, सर्वश्रेष्ठ योगदान देणे कधीही बंद करू नये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही इतके सकारात्मक असा की, लोकांनी शंका घ्यावी, वचन पाळण्यात इतके पक्के असा की, लोकांमध्ये भीती निर्माण व्हावी आणि कामाप्रती अशी निष्ठा असावी की, हारदेखील हार पत्करेल. तुम्ही श्रेष्ठ काम कधीही बंद नाही केले पाहिजे.
रोहित कुमारबौरी जमशेदपूरचा रहिवासी आहे. वय अवघे 17 वर्षे. तो झारखंडच्या जमशेदपूर गोल्फ क्लबमध्ये कॅडी म्हणून काम करत होता आणि मोबदल्यात महिन्याभराचे त्याला केवळ 2500 रुपये मिळत होते. तो बिष्टुपूरच्या जुबली रोडवर एका आऊट हाऊसमध्ये राहतो. कमी वयात वडिलांचे छत्र हरवणे तसेच कॅडी म्हणून काम करताना मिळणाऱ्या अत्यल्प कमाईमुळे तो आपले घर चांगल्या प्रकारे चालवू शकत नव्हता. त्यामुळे त्यांची आई सरस्वती घरोघरी जाऊन धुणी-भांडी साफ-सफाईचे काम करत असे. गोल्फ क्लबमध्ये खेळत असलेल्या गोल्फरसोबत चालणे आणि त्याचे सर्व गोल्फ स्टिक्स उचलणे, हे कॅडीचे मुख्य काम असते. ढोबळमानाने हे काम गोल्फरच्या सहायकासारखे असते. वास्तविक, यासाठी सहायकाला एक विशिष्ठ नाव देण्यात आले आहे, कॅडी. हे ऐकण्यासाठी आकर्षक वाटते परंतु यातून जास्त कमाई होत नाही. पाच वर्षांपर्यंत कॅडीचे काम केलेल्या रोहितने हळूहळू या अभिजातीय खेळाचे अनेक बारकावे, डावपेच शिकले. यासाठी त्याची मदत केली ती जमशेदपूर गोल्फ क्लबचे चीफ अॅडमिनिस्ट्रेटर (मुख्य प्रशासक) 1986 चे सियोल एशियाडमध्ये टीम इंडियाचे कॅप्टन राहिलेले एलन सिंह यांनी.
रोहित जमशेदपूर कोऑपरेटिव्ह कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. कॅडीचे काम करणे तसेच अनेक वर्षे मातब्बर खेळाडूंच्या सान्निध्यात राहिल्याने त्याने गोल्फ खेळण्यातही प्रावीण्य मिळवले. ऐलन यांनी त्याच्या या कलेला अधिक धार दिली. विशेषत: रोहितला या तथ्याची मदत झाली की, त्याच्यासारखे अनेक कॅडी नंतरच्या काळात उत्तम गोल्फर बनले. या अनेक कारणांमुळे रोहितला या खेळाप्रती एक प्रकारची तृष्णा कायम राहिली. त्याला आशा होती की, गोल्फ खेळण्याच्या त्याच्या कौशल्यामुळे 2013 च्या सब ज्युनियर टूर टायटलमध्ये नक्कीच जागा मिळेल. परंतु अंतिम यादीत त्याचे नाव आल्याने तो नाउमेद होऊन गोल्फ क्लब रोडकडे जाणेच बंद केले.
बाद केल्याचा त्याला असा दंश झाला की, त्याने कॅडीचे काम तर सोडलेच शिवाय गोल्फच्या मैदानात एक वर्ष पाऊलदेखील ठेवले नाही. वास्तविक, त्याचे मार्गदर्शक ऐलन सिंह यांनी सातत्याने त्याचे मनोधैर्य वाढवले, जेणेकरून पुन्हा एकदा तो क्लबशी जोडला जावा. यानंतर मात्र त्याने मागे वळून पाहिले नाही. एकवर्षापूर्वी बाद करण्यात आलेल्या रोहितने वाईट अनुभवनांना तिलांजली देत पुढचा मार्ग पकडला. नव्याने खेळ सुरू केला आणि या वर्षी एप्रितलमध्ये ईस्ट झोनकडून सब ज्युनियर टूर टायटलचा किताब जिंकला.
त्याच्या गोल्फ खेळण्याच्या अद‌्भुत क्षमतेने गरिबी दूर केली. वास्तविक, हा उत्तम युवा खेळाडू गेल्या जूनमध्ये रॉयल कॅलकटा गोल्फ कोर्समध्ये चॅम्पियनचा किताब जिंकू शकला नाही, पण त्याच्या खेळाची खूप प्रशंसा झाली. विपरीत परिस्थिती आणि अनेक समस्यांना सामोरे जात रोहित अधिक कणखर आणि मजबूत झाला. प्रत्येक दिवस त्याने आपला खेळ उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न केला. या यशाने त्याच्यात उत्साह भरला आणि गंभीरपणे गोल्फमध्ये करिअर बनवण्याविषयी विचार करू लागला. त्याचे मार्गदर्शक ऐलन यांच्या मते, रोहित भविष्यातील देशातील सर्वात्कृष्ट गोल्फर पैकी एक आहे. एक सामान्य कॅडी राहिलेला हा युवक आज या स्टील सिटीच्या गोल्फिंग मॅनेजर्सचा आवडता बनला आहे आणि त्यांना विश्वास आहे की, रोहित टी टर्फवर दीर्घ करिअर बनवेल. तो लवकरच प्रोफेशनल गोल्फर बनेल, असा विश्वास रोहितला आहे. त्याचे मुख्य ध्येय पैसे कमावणे आणि आपल्या आईला दु:खांपासून सुटकारा देणे आहे.